Mumbai local shocking video: मुंबई लोकल ही मुंबईकरांची श्वास…एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी तिचा सर्वाधिक वापर केला जातो. या लोकल ट्रेनमधून कामावर जाणाऱ्या लोकांसोबत वृद्धांपासून लहान मुलांपर्यंत सगळेच प्रवास करत असतात. त्यामुळे या लोकलमध्ये एक वेगळीच दुनिया असते. रोजची जाणारी मंडळींची एक वेगळीच मजा असते. गाणी, भजन किर्तन करत त्यांचा प्रवास सुरु असतो. असं म्हणतात, प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असतं. पण काही लोकं या म्हणीला फारच गांभिर्यानं घेतात. अन् नको त्या गोष्टी करू लागतात. अशी शेकडो कपल तुम्ही आजवर समुद्रकिनारी, हॉटेल्समध्ये, सिनेमागृहात आणि हल्ली तर मेट्रोमध्ये सुद्धा पाहिली असतील. रोमान्स करताना आसपास असलेली लोकं त्यांना पाहताहेत याचं भान देखील या प्रेमी युगलांना नसतं. अशाच एका कपलचा संतापजनक मुंबई लोकलमधला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही संताप व्यक्त कराल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुंबई लोकलमध्ये कपलचे अश्लील चाळे सुरु आहेत. यामध्ये तरुणी तरुणाच्या चक्क मांडीवर बसली आहे आणि तरुण अश्लील चाळे करत आहे. त्यांना आजूबाजूचं काहीच भान राहिलं नाहिये. की या कपलला आजूबाजूच्या लोकांचीही भीती नव्हती. ते सीटवर आरामात एकमेकांच्या प्रेमात बुडालेले दिसले. विशेष म्हणजे त्यांना थांबवण्याऐवजी लोक त्यांचे व्हिडिओ बनवण्यात व्यग्र होते. मात्र, याचाही जोडप्यावर कोणताही परिणाम झाला नाही. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांसोबत मुंबईकरही संतापले आहेत.

काहींनी हे वर्तन सार्वजनिक ठिकाणी अयोग्य ठरवले, तर काहींनी खाजगी क्षण इतक्या उघडपणे शेअर करण्यावर नाराजी व्यक्त केली. दरम्यान गेल्या काही वर्षांमध्ये सार्वजनिक ठिकाणी कसलाही विचार, लाज न बाळगता खुल्लम खुल्ला हे कपल अश्लील चाळे करताना दिसतात. ज्या गोष्टी चार भिंतीत केल्या जात होत्या आज खुलेआम होत असल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजी आहे.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकल ट्रेन ही मुंबईकरांचा प्रवासाचं साधन आहे. तिथे कपलचे असे अश्लील चाळे पाहून यूजर्स संतापले आहेत. लोकलमधून वृद्धांपासून लहान मुलंही प्रवास करतात. अशावेळी या प्रेमीजोडप्यांचे असे अश्लील चाळे योग्य नाही. त्यामुळे या कृतींवर रोख लावण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी होते आहे.