प्रत्येक नवरा त्याची बायकोशी भांडण होणार नाही याची काळजी घेत असतो, कारण पत्नीला आपल्या कोणत्या बोलण्याचा राग येईल आणि तिचा मूड कधी खराब होईल हे सांगता येत नाही. शिवाय बायकोचा मूड खराब झाला तर ती आपलाही मूड खराब करेल याचीही भिती नवऱ्याला असते. खरं तर, पती-पत्नीमध्ये भांडणं होणे ही एक सामान्य बाब आहे. पण सध्या एका जोडप्याने थेट विमानात भांडण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक विवाहित जोडपे विमानातून प्रवास करत असल्याचे दिसून येत आहे. यादरम्यान पती-पत्नीमध्ये काही गोष्टीवरून भांडण होते. हा वाद इतका वाढतो की पत्नी नवऱ्याला थप्पड मारण्यासाठी हात उचलते. तर घाबरलेला पती एअरहोस्टेसला मदतीसाठी बोलावतो आणि म्हणतो, “माझी बायको मारत आहे, कृपया मला वाचवा.” यावेळी विमानात बसलेले इतर प्रवासी त्यांच्याकडे पाहून हसायला सुरुवात करतात.

हेही पाहा- बाईकवर बसलेल्या डिलिव्हरी बॉयने केलेलं ‘ते’ संतापजनक कृत्य व्हायरल; Video पाहताच नेटकऱ्यांनी केली कारवाईची मागणी

पतीने एअरहोस्टेसची घेतली मदत –

पतीने एअरहोस्टेसच्या मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर पत्नी आपला चेहरा हाताने झाकून घेते. नवऱ्याच्या या कृत्याचा तिला राग येतो आणि मग ती थप्पड मारण्यासाठी हात पुढे करते. पण यांचा वाद मोठ्याने सुरु असल्यामुळे विमानातील सर्व प्रवाशांचे लक्ष या त्यांच्याकडे जाते आणि सगळे या जोडप्याकडे बघू लागतात. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरीही खूप मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. तर काही लोकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

नेटकऱ्यांनी केली टीका –

विमानात असे कृत्य केल्याबद्दल काही युजर्सनी या जोडप्यावर टीका केली आहे, अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओला पूर्वनियोजित म्हटलं आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं, “हा मूर्खपणा आहे.” तर दुसऱ्या युजरने लिहिलं, “महिला तिच्या पतीला मारत आहे. हे अजिबात हास्यास्पद नाही.” तिसऱ्याने लिहिलं, “इतक्या लोकांमध्ये आपला चेहरा लपवणे किती कठीण आहे.”