Viral Instagram Reels: प्रेम, लग्न हे असं नातं आहे जिथे दोन व्यक्ती आयुष्यभरासाठी एकमेकांबरोबर राहतात. आयुष्यभराचा जोडीदार निवडताना अनेकांच्या अपेक्षा असतात की त्याच्याबरोबर आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने जगावा, त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलावं, कोणतीच गोष्ट सांगताना किंवा करताना कसलाच संकोच वाटला नाही पाहिजे पण असे जोडीदार मिळण्यासाठी खरचं भाग्य लागतं. कोणाची पर्वा न करता आपलं आयुष्य मजेत आणि आनंदात जगणारे जोडपे फार क्वचित पाहायला मिळतात. सोशल मीडियावर सध्या अशाच एका अफलातून जोडप्याचाचा डान्स व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. ‘नाशिक के ढोल’ या गाण्यावर समुद्र किनाऱ्यावर दोघही बिनधास्तपणे नाचत असल्याचे दिसत आहे. दोघांनी समुद्रकिनाऱ्यावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

इंस्टाग्रामवर ‘awwww__moments’ नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओत दोघंही इतक्या उर्जेने नाचताना दिसत आहे की सर्वजण बघतच राहिले आहेत. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी जोडप्याचे तोंडभरून कौतुक केले.

व्हिडिओमध्ये एक जोडपे समुद्रकिनाऱ्यावर पूर्ण आनंदाने नाचताना दिसत आहे. तिथे बसलेले लोक त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आवाज कळ्यांचा आणि आवाजांचा जल्लोष करत या जोडप्याला प्रोत्साहन दिलं. समुद्राच्या लाटा, दोघांचा उत्साहपूर्ण नृत्य आणि सर्वांनी त्यांना दिलेले प्रोत्साहन या सर्व गोष्टींनी या व्हिडिओला खास बनवलं आहे.

या व्हिडिओवर १० मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि लाखो लाईक्स मिळाले असून, नेटकऱ्यांनी या जोडप्याची भरभरून स्तुती केली आहे. कोणी त्यांना ‘राम मिलाई जोडी’ म्हटलं, तर कोणी त्यांच्या आत्मविश्वासाचं कौतुक केलं.

एका युझरने लिहिलं – “ अत्यंत गोंडस जोडपं आहे. वायब साईजशी नव्हे, मनाशी जुळते…! सांगितल्यानंतर त्यांच्या साईजकडे लक्ष जाते ज्याची अजिबात गरज नव्हती. आमचे लक्ष त्यांच्या क्युटनेसवर होते”

व्हिडिओवर कमेंट करताना दुसऱ्या एका युजरने म्हटले की, “एवढ्या छान परफॉर्मन्ससाठी आणि इतक्या सुंदर जोडप्यासाठी यापेक्षा चांगला स्टेज असू शकत नाही… हसत राहा.” तिसऱ्या युजरने म्हटले की, “समुद्राच्या लाटांनी सौंदर्यात भर घातली. ते खरोखर एकमेकांसाठी बनलेले आहेत.” त्याच वेळी, दुसऱ्या युजरने म्हटले की, “इतरांना काय वाटते याची पर्वा न करणे हाच सर्वोत्तम जीवन जगण्याचा सर्वोत्तम मंत्र आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडिओमधून एक मोठा संदेशही मिळतो – “दुसऱ्यांच्या मताची चिंता न करता स्वतःच्या आनंदात जगणं म्हणजे खरं आयुष्य!”