पाळीव प्राणी अनेकांच्या घरातील केंद्रबिंदू असतात. घरातील प्रत्येक सदस्य त्यांच्यावर जीवापाड प्रेम करत असतो, इतकेच नाही तर ते पाळीव प्राणीदेखील घरातल्या प्रत्येक सदस्याला तितकाच जीव लावतात, घरातल्या सदस्यांवर एखादे संकट ओढावले तर ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मदतीसाठी धाव घेतात, असे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. मुक्या प्राण्यांना एकदा जीव लावला की ते सुद्धा माणसाच्या मायेनं माणसाळतात. प्राण्यांनाही मालकाच्या भावना कळतात. मालक खूश असेल तर तेही खूश असतात तर कधी मालकावर संकट आलं तर त्यातही ते त्याला सावरण्याचा प्रयत्न करतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक शेतकरी गुडघ्यावर डोकं ठेवून जमिनीवर बसला आहे. असं दिसतं की, शेतकरी खूप दुःखी आहे. दरम्यान, दोन श्वान त्याच्याकडे जातात आणि त्याला खूश करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्या शेतकऱ्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांच्या मिशनमध्ये अपयश आल्यावर कुत्रे भुंकत त्याच्यापासून दूर जातात. काही वेळाने एकामागून एक अनेक गायी त्याच्याकडे येऊ लागल्या. गायींपैकी एक गाय ताबडतोब शेतकऱ्यावर आपले डोके घासते आणि त्याला मिठी मारू लागते. मुक्या प्राण्यांनाही आपल्या मालकाच्या मानतलं लगेच कळतं हे या व्हिडीओमधून पाहायला मिळतंय.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: आनंद महिंद्रांनी नितिन गडकरींकडे केली ‘सुंदर’ मागणी, केंद्रीय मंत्री पूर्ण करतील का?

मुक्या प्राण्याला जीव लावला ते देखील आपल्याशी जवळीक साधते आणि आपल्या प्रेमाचा स्वीकार करते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरीही व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत.