Unique Cricket Match: मैदानातील हा सामना साधी क्रिकेट मॅच नव्हती… पहिल्या क्षणापासून शेवटच्या चेंडूपर्यंत प्रत्येक क्षणात होती ताणतणावाची कमाल. चेंडू हवेत उडायचा की सरळ विकेटवर आदळायचा, याचा काहीच अंदाज नव्हता. खेळाडूंची प्रत्येक धाव, प्रत्येक झेल आणि प्रत्येक फटका प्रेक्षकांना खुर्चीच्या कडेवर बसवून ठेवत होती. सामना कोणाच्या बाजूने वळेल, शेवटच्या क्षणी कोण करेल कमाल आणि कोणाचे स्वप्न तुटेल याचा अंदाज लावणंही अवघड झालं होतं. या थरारक क्षणांनी भरलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहाल, क्रिकेटची खरी जादू म्हणजे काय…
क्रिकेट असं पण खेळतात का? मैदान सरळ नाही, नियम वेगळे आणि खेळाडूंची शैली बघून तुम्ही थक्क व्हाल. चेंडू टाकला की तो जाईल कुठे वर, खाली की बाजूला, याचा काही नेम नाही. हा भन्नाट सामना पाहून तुम्हालाही वाटेल, क्रिकेटच्या पाठ्यपुस्तकात हा खेळ नक्की जोडायला हवा होता.
सोशल मीडियावर अतरंगी लोकांची आणि त्यांच्या भन्नाट कल्पनांची काहीच कमी नाही. रोज नवनवीन व्हिडीओज आपल्या टाइमलाइनवर झळकत असतात आणि काही तर पाहताक्षणीच व्हायरल होतात. सध्या असाच एक भन्नाट क्रिकेटचा व्हिडीओ तुफान चर्चेत आहे. हा क्रिकेटचा खेळ पाहून भारतीय संघातील दिग्गज खेळाडू रोहित आणि कोहलीसुद्धा कपाळाला हात लावतील.
हा कसला क्रिकेट सामना?
व्हिडीओमध्ये काही तरुण क्रिकेट खेळताना दिसत आहेत. पण, त्यांचे पिच हे साधे सपाट मैदान नाही, तर सरळ उतरण वर आहे. बॅटिंग वरच्या बाजूला उभं राहून केली जाते, तर बॉलिंग खालून केली जाते. गंमत म्हणजे उतरण इतकी घसरडी आहे की शॉट मारल्यावर फलंदाज थेट घसरून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचतो. पण, रनिंग एंडवर उभ्या खेळाडूची मात्र चांगलीच धावपळ होते.
अशी मॅच कधी पाहिली आहे का?
हा अनोखा खेळ पाहून कोणीही थक्क होईल. अशा उतरणवर क्रिकेट खेळणे ही कल्पनाही फार जणांच्या डोक्यात येणार नाही आणि नेमकं हेच कारण आहे की हा व्हिडीओ प्रचंड वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
व्हिडीओ कुठे पाहायला मिळेल?
हा व्हिडीओ ‘X’ (पूर्वीचं ट्विटर) प्लॅटफॉर्मवर @GemsOfCricket या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहून भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलं, “इंडियन पहाड लीग!” दुसऱ्याने लिहिलं, “हे खेळाडू कुठेही खेळू शकतात.” तिसरा म्हणतो, “इथे रन आऊट होण्याची शक्यताच नाही.” तर चौथा लिहितो, “हा तर वेगळ्याच लेव्हलचा गेम आहे.”
येथे पाहा व्हिडीओ
जगात क्रिकेटचे अनेक प्रकार पाहायला मिळाले, पण उतरणीवरचा हा ‘स्पेशल एडिशन’ सामना लोकांच्या कायम लक्षात राहणार हे नक्की!