Crocodile Attack Video: मगर (Crocodile) ही किती खतरनाक शिकारी आहे हे काही वेगळं सांगायला नको. एका फटक्यात समोरच्या प्राण्याचे दोन तुकडे करण्याची क्षमता मगरीमध्ये असते. जसा सिंह जंगलातील सर्वांत आक्रमक, हिंसक प्राणी मानला जातो, तसे मगरीलाही पाण्यातील सर्वांत हिंसक प्राणी मानले जाते. ज्यामध्ये पाण्याखाली सर्वात मोठ्या प्राण्यालाही आपली शिकार बनवण्याची तिची ताकद आहे. मगर हा भक्षक इतका धोकादायक आहे की, तो भक्ष्याला त्याच्या मजबूत जबड्याने पकडतो, चावतो आणि खातो हे तुम्ही अनेक व्हिडीओंमध्ये पाहिले असेलच. पण, आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तुमचा आत्मा थरथर कापेल. व्हायरल व्हिडीओमध्ये मगरीची शिकार प्राणी नसून एक जिवंत माणूस आहे. नेमकं घडलं काय ते जाणून घेऊया…

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण मगरीच्या तावडीत अडकल्याचे दिसून येते. व्हिडीओची सुरुवात इतकी भयानक आहे की सर्वांनाच धक्का बसतो. व्हिडीओमध्ये मगर तिच्या मजबूत जबड्याने तरुणाचा पाय पकडते आणि त्याला ओढून त्याची शिकार बनवण्याचा प्रयत्न करते. हे भयानक दृश्य पाहून तिथे उभे असलेले लोक ओरडतात.

नेमकं घडलं तरी काय?

मिळालेल्या माहितीनुसार, एक तरुण सेल्फी काढण्यासाठी पाण्यात उडी घेतो. या तरुणाला ही मगर खरी नसल्याचे वाटते मात्र पाण्यात जाताच त्याचा हा गैरसमज दूर होतो आणि मोठा धक्का बसतो. मगर लगेच तरुणावर हल्ला करते. त्या तरुणाचा पाय वेगळा करण्याचा प्रयत्न करते. मगरीने त्या तरुणाला डावीकडे आणि उजवीकडे मारण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून त्याचा पाय वेगळा होईल. त्या तरुणाची अवस्था पाहून सोशल मीडियावरील प्रत्येकजण दुःखी झाला आणि त्याला वाचवण्यासाठी कोणीही का गेले नाही असे प्रश्न उपस्थित करू लागलाय. पण, त्या भयानक मगरीच्या शक्तीसमोर तिथे उपस्थित असलेले प्रत्येकजण असहाय्य दिसत होते. हे सर्वच दृश्य पाहून आता हा माणूस जिवंत वाचतो की नाही याचीही शाश्वती राहत नाही.

येथे पाहा व्हिडीओ

व्हिडिओ वेगाने व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @gill_saab नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. बातमी लिहिण्याच्या वेळेपर्यंत हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला होता. इतकेच नाही तर व्हिडीओला लाखो लाईक्स आणि कमेंट्सही मिळाल्या आहेत. तथापि, हा व्हिडीओ कोणत्या ठिकाणचा आहे हे अद्याप निश्चित झालेले नाही. ही घटना पाहून एका वापरकर्त्याने लिहिले की, “कोणीतरी मगरीवर हल्ला करा, जेणेकरून त्या व्यक्तीला वाचवता येईल.” त्याच वेळी काही लोकांनी तिथे उपस्थित असलेल्या लोकांवरही प्रश्न उपस्थित केले आहेत, जे फक्त तमाशा पाहत आहेत. व्हिडीओवर अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत आणि तो वेगाने व्हायरल होत आहे.