मृत्यूच्या दाढेतून सुखरुप परत येणं, हे वाक्य आपण अनेकवेळा ऐकलं आहे. या वाक्याला साजेसा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अक्षरश: मगरीच्या दाढेतून बाहेर आल्याचं दिसत आहे. मगरीच्या जबड्यातून कोणताही प्राणी बाहेर येणं तसं अशक्य आहे. पण या व्हिडीओतील कासव इतकं नशीबवान होतं की ते मगरीच्या तोंडातून जिवंत परत आलं आहे. पण हे दृश्य खूप भयानक आणि अंगावर शहारा आणणारं आहे.कारण शेवटच्या क्षणापर्यंत हे कासव मगरीच्या डबड्यातून सुटेल असं पाहताना वाटत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर अनेकांनी कासवाला खूप भाग्यवान असल्याटं म्हटलं आहे. कारण, मगर एक अतिशय शक्तिशाली उभयचर प्राणी आहे. पाण्यात तर मगरीची शक्ती दुप्पट असते ती एखाद्या हत्तीलाही पाण्यात हरवू शकते. त्यामुळे पाण्यात मगरीशी वैर नको, असं म्हटलं जातं. एकदा का मगरीच्या तावडीत एखादा प्राणी सापडला की तो जिवंत परत येणं अशक्य असत.

हेही पाहा- शाळेतून परतणाऱ्या वृद्ध शिक्षकाला महिला पोलिसांकडून काठ्यांनी मारहाण, संतापजनक घटनेचा Video व्हायरल

त्यामुळे कासवासारखा प्राणी मगर एका क्षणात गिळून टाकेल यात संशय नाही. मात्र, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल कारण मगरीच्या तावडीतून हे कासव सुखरुप परत कसं येऊ शकते? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत मगरीने तिच्या जबड्यात एका कासवाला पकडल्याचं दिसत आहे. ती कासवाला दाबण्याचा प्रयत्नही करताना दिसत आहे. मात्र, कावसाची पाठ टणक असल्याने मगरीला कासव गिळता येत नाही. त्यानंतर मगर आपल्या तीक्ष्ण दातांनी कासवाला खाण्याचा प्रयत्न करते. मात्र खूप प्रयत्न करुनही तिला कासव गिळता येत नाही. अशातच मगरीच्या जबड्यातून कासव सटकत आणि हळू हळू ते निघून गेल्याचं दिसत आहे.

हेही पाहा- चहासोबत टोस्ट खायला तुम्हालाही आवडतात? तर टोस्ट बनवतानाचा ‘हा’ किळसवाणा Video एकदा पाहाच

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ@everglades या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ खूप लोकांना खूप आवडला असून अनेकांनी व्हिडीओतील कासवाच्या नशिबाचं कौतुक केलं आहे. कारण मगरीच्या तोंडातून जिवंत सुटणे केवळ अवघडच नाही तर अशक्य आहे. तर काही वापरकर्त्यांनी म्हटलं आहे की, ‘खरोखर कासव मृत्यूच्या दाढेतून परतलं आहे.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crocodile failed to hunt turtle watch shocking viral video jap
First published on: 22-01-2023 at 12:59 IST