scorecardresearch

नदी किनारी सुरु असलेल्या पार्टीत अचानक होते भल्यामोठ्या मगरीची एन्ट्री, मग पुढे जे काही घडते ते VIRAL VIDEO मध्ये एकदा पाहाचं

मगरीची कृती पाहून जीपमधील पर्यटकांनाही काही वेळ काय करावे सुचत नव्हते. काहीवेळ घाबरलेल्या मनस्थितीमध्ये असलेले पर्यटक या घटनेचा आनंदही घेत होते.

crocodile steals ice box from elderly people on picnic in south africa see viral video
भल्यामोठ्या मगरीची नदी किनाऱ्यावरील पार्टीत एन्ट्री (Latest Sightings – Kruger facebook page)

जंगल सफारीदरम्यान पर्यटकांना अनेकदा प्राण्यांचा सामना करावा लागतो. यात प्राणी अनेकदा अशी काही कृती करतात ज्यामुळे पर्यटकांची भंबेरी उडते. यामुळे पर्यटकांना सेफ कारमधून जंगल सफारीसाठी नेले जाते. मात्र जगभरात असे अनेक प्रसिद्ध जंगल आहेत जिथे ओपन कारमधून पर्यटक सफारीचा आनंद घेऊ शकतात, मज्जा करु शकतात. यासाठी दक्षिण अफ्रिकेची जंगल सफारी प्रसिद्ध आहे. नुकत्याच घडलेल्या घटनेत काही लोक जंगल सफारीदरम्यान नदी किनारी पार्टी करत असतात, तेव्हा तिथे एका भल्यामोठ्या मगरीची एन्ट्री होते आणि पुढे असे काही घडते ज्यामुळे ते पर्यटकही काही वेळ घाबरतात, या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ट्रॅव्हल कंपनीच्या लेटेस्ट साइटिंग्जच्या पोस्टनुसार, एक भलीमोठी मगर जंगल सफारासाठी आलेल्या पर्यटकांच्या पार्टीत शिरते आणि त्यांनी आणलेला आइस बॉक्स जबड्यात घट्ट पकडून ठेवते. काहीवेळ बॉक्स जबड्यात पकडून ठेवल्यानंतर पुढे तो बॉक्स घेऊन नदीत परतते.

फेसबुकवर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक भलीमोठी मगर नदीतून बाहेर पडते. यावेळी किनाऱ्यावर जीप कारबाहेर पार्टी करणाऱ्या पर्यटकांजवळ पोहचते. यानंतर त्यांच्या खाण्याच्या पदार्थ्यांच्या बाजूला ठेवलेला आइस बॉक्स जबड्यात पकडते आणि पुन्हा नदीत परतते. जोहान्सबर्गपासून अवघ्या २.५ तासांच्या अंतरावर असलेल्या आणि वॉटरबर्ग पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या रिएटस्प्रूट प्रायव्हेट लॉजमध्ये ही घटना घडली.

UPI समाचारने दिलेल्या वृत्तानुसार, रोवेना मोल्ड हा 70 वर्षीय सेवानिवृत्त व्यक्ती आणि त्यांच्या काही मित्र- मैत्रिणींसह दक्षिण आफ्रिकेतील Rietspruit गेम रिझर्व्ह येथे आरामात गेम ड्राइव्ह करत होते. या जंगल सफारीदरम्यान त्यांना सर्वप्रथम एका छान चित्त्याचे दर्शन घडते. नेहमीप्रमाणे त्यांची ही सफारी अगदी चांगल्याप्रकारे सुरु होती, पण सर्व काही सुरळीत चालू असतानाच अचानक एका भल्यामोठ्या मगरीची पाण्यातून बाहेर एन्ट्री होते. ही मगर पाण्यातून बाहेर येते आणि त्यांची पार्टी सुरु असते त्याठिकाणी येऊन थांबते. काहीवेळ थांबल्यानंतर खाण्यासाठी ठेवलेले पदार्थ इकडे तिकडे फेकते आणि आइस बॉक्स जबड्यात पडकून नदीत घेऊन जाते. पुढे नदीत एक मगर त्या बॉक्ससाठी झटापट करते. Latest Sightings – Kruger या फेसबुक पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

या घटनेत पर्यटक जीपमध्ये बसले होते म्हणून मगरीने त्यांना काही हानी पोहोचवली नाही, पण हे पर्यटक जर जीपखाली उतरून किनाऱ्यावर बसले असते तर मगरीने नक्कीच त्यांना काहीतरी हानी पोहचवली असती. त्यामुळे अनेकदा जंगलातील प्राण्यांचे वर्तन तुमच्या अनुभवाच्या किंवा अपेक्षांच्या विरुद्ध असू शकते. त्यामुळे जंगल सफारीदरम्यान पर्यटकांनी सतर्क असणे गरजेचे आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 10:51 IST

संबंधित बातम्या