why do crocodiles cry :“मगरीचे अश्रू” ही म्हण तुम्ही ऐकली आहे. या म्हणीचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का? “मगरीचे अश्रू” म्हणजे खोटे दुःख व्यक्त करणे किंवा सहानुभूती दाखवण्याचा दिखावा करणे. या म्हणीमागे असा समज आहे की, मगरी जेव्हा तिचे भक्ष्य खातात तेव्हा ते रडतात. यावरूनच हा वाक्प्रचार एखाद्या व्यक्तीच्या खोट्या भावनांसाठी वापरला जातो, जे प्रत्यक्षात दुःखी नसतानाही दुःखी असल्याचे भासवतात. मात्र, आता वैज्ञानिकांनी स्पष्ट केलं आहे की हे भक्ष्य खाताना मगरीच्या डोळ्यातून येणारे अश्रू हे दुःखाचे अथवा भावनिक नसून ते पूर्णतः शारीरिक आणि संरक्षणात्मक प्रतिक्रिया आहेत.
भक्ष्य खाताना मगरींच्या डोळ्यात अश्रू का येतात? (Why crocodiles produce tears)
जेव्हा मगर आपल्या जबड्याने वारंवार हालचाल करते, तेव्हा तिच्या अश्रूग्रंथींवर दबाव येतो, त्यामुळे डोळ्याभोवती पातळ द्रव दिसतो. पाण्याबाहेर आल्यानंतरही हे अश्रू डोळे ओलसर आणि स्वच्छ ठेवण्यासाठी उपयोगी पडतात, त्यामुळे ही एक नैसर्गिक जैविक क्रिया आहे, त्यामागे कोणतीही भावना नसते.
भावनिक होऊन रडणे ही माणसांची अद्भूत क्षमता (Emotional crying is unique to humans)
आनंद, दु:ख, राग अशा भावनांमुळे रडू येण्याची ही अद्भूत क्षमता फक्त मानवांमध्येच आढळते. इतर प्राणी—पक्षी, सरपटणारे किंवा सस्तन प्राणी हे अश्रू फक्त संरक्षणासाठी तयार करतात, त्यामुळे मगरींचे अश्रू हे काही दुःख, वेदना किंवा आनंदाशी संबंधित नसतात.
मगरीचे अश्रूबाबत गैरसमज आणि सांस्कृतिक अर्थ (Misunderstanding and cultural impact)
“मगरीचे अश्रू” हा शब्दप्रयोग अनेक देशांत खोट्या भावना किंवा बनावट सहानुभूती दाखवण्यासाठी वापरला जातो. पण, विज्ञानाच्या दृष्टीने हे अश्रू फसवे नव्हे तर नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहेत. या संशोधनामुळे मगरींच्या वर्तनावरील जुन्या गैरसमजांना वैज्ञानिक उत्तर मिळालं आहे.
शास्त्रज्ञ काय सांगतात? (What did scientists observe)
वन्य आणि बंदिस्त परिस्थितीत मगरींवर केलेल्या अभ्यासांतून हा निष्कर्ष समोर आला आहे की, मगर भक्ष्य खाताना किंवा दीर्घ काळ पाण्यात राहिल्यानंतर अश्रू दिसतात. मात्र, मानवांसारखी भावनिक प्रतिक्रिया त्यांच्यात दिसून आलेली नाही, त्यामुळे “मगरीचे अश्रू” म्हणजे फक्त जैविक क्रिया, भावनिक नव्हे.
