मध्य प्रदेशमधील इंदूर शहरामध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथील एका कोट्याधीशाची पत्नी रिक्षावाल्याबरोबर पळून गेली आहे. विशेष म्हणजे हा रिक्षावाला या महिलेपेक्षा १३ वर्षांनी लहान आहे.

हा सर्व प्रकार १३ ऑक्टोबर रोजी शहरातील खाजराना परिसरामध्ये घडला असून घटनेच्या दोन आठवड्यानंतर पतीने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यावर यासंदर्भातील खुलासा झाला आहे. पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार कोट्यावधीचा मालक असणाऱ्या उद्योगपतीने केलीय. पतीने केलेल्या तक्रारीमध्ये ही महिला घरातून पळून जाताना सोबत ४७ लाख रुपये घेऊन गेल्याचंही म्हटलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार हा रिक्षावाला कायम या महिलेला घरी सोडायचा. ही महिला १३ ऑक्टोबर रोजी घरीच आली नाही. त्यानंतर या व्यक्तीला त्याच्या घरातील ४७ लाख रुपयांची रोख रक्कमही जागेवर नसल्याचं दिसून आलं. तेव्हाच त्याला पत्नी पळून गेल्याची शका आली. या उद्योगपतीकडे मोठ्याप्रमाणात जमीन असल्याने घरामध्ये तो बरेच पैसे ठेवायचा अशी माहिती समोर येत असल्याचं टाइम्स नाऊने स्थानिक प्रसार माध्यमांच्या हवाल्याने म्हटलं आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून ते या उद्योगपतीची पत्नी आणि रिक्षाचालकाचा शोध गेत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्राथमिक तपासामध्ये रिक्षा चालकाचं नाव इम्रान असल्याची माहिती समोर आलीय. तो ३२ वर्षांचा असून यापूर्वी तो खांडवा, जावरा, उज्जैन आणि रतलाममध्ये राहिला आहे. या सर्व ठिकाणी पोलिसांनी छापेमारी सुरु केली असून ते या दोघांचा शोध घेत आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे इम्रानच्या ओळखीच्या लोकांच्या घरी छापेमारी सुरु असतानाच त्याच्या एका मित्राच्या घरी ३३ लाखांची रोकड सापडली आहे.