Crying while cutting onions: डोळे खूप झोंबतात आणि डोळ्यातून पाणी येतं त्यामुळे कांदा कापताना तुम्हालाही त्रास होत असेलच ना? पण असं का होत असेल. तसेच उपाय बरेच आहेत, पण यामागचं नेमकं कारण काय? यामागच्या अचूक भौतिकशास्त्राचा उलगडा संशोधकांनी केला आहे.
गेल्या अनेक दशकांपासून स्वयंपाक करणाऱ्याच्या डोळ्यात कांद्याने अश्रू आणले आहेत. मात्र एका नवीन अभ्यासात ते का आणि कसे थांबवायचे हे स्पष्ट झाले आहे. कॉर्नेल विद्यापीठातील संशोधकांना असे आढळले आहे की, कांद्यातून अश्रू ढाळणारा घटक हा एकाच वेळी बाहेर पडत नाही. त्याऐवजी प्रत्येक कापणी करताना दोन टप्प्यांमध्ये प्रक्रिया सुरू करते. या अभ्यासात असेही आढळले की, जेव्हा सुरू बोथट असते किंवा खूप वेगाने फिरते तेव्हा थेंबांची संख्या आणि ऊर्जा दोन्ही वाढवतात. त्यामुळे हवेत तीव्र सल्फर संयुगे बाहेर पडतात. यावर सोपा उपाय म्हणजे अश्रूंना कारणीभूत हा घटक जो धुक्यासारखा असतो तो कमी करण्यासाठी आणि तुमचे डोळे कोरडे ठेवण्यासाठी सुरू धारदार ठेवा आणि कांदा हळूवारपणे कापा.
जेव्हा कांदा कापला जातो, तेव्हा एंझाइम सल्फर संयुगांना प्रतिक्रिया देऊन सिन-प्रोपेनेथियल एस ऑक्साइड तयार करतात. हाच रडवण्यास कारणीभूत असतात. मात्र, प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अकादमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासात असे आढळले की, हे फक्त रसायनशास्त्रच नाही तर भौतिकशास्त्रही आहे. कापण्याच्या क्रियेमुळे थेंबाचा स्फोट होतो, तिथे कांद्याच्या खराब झालेल्या पेशींमधून द्रव हिंसकपणे बाहेर पडतात. जलद गतीने कापण्यामुळे आणि सुरू धारदार नसेल तर याचा परिणाम अधिक होतो, अधिक पेशी तुटतात आणि हवेत अधिक त्रासदायक एरोसोल बाहेर टाकतात.
अल्ट्रा हाय-स्पीड कॅमेरा वापरून संशोधकांनी कांद्याच्या थरांशी सुरीचा संवाद कसा होतो याचे निरीक्षण केले. एक धारदार सुरी कठीण बाह्य त्वचा आणि आतील मेसोफिलमधून कांदा स्वच्छपणे कापते. त्यामुळे कमीत कमी दाब येतो. याउलट एक जड किंवा धार नसलेली सुरी वापरल्याने कांदा चिरण्यापूर्वी चिरडला जातो आणि त्यामुळे अधिक द्रव बाहेर पडते आणि डोळ्यातून पाणी येतं. हे मायक्रोबर्स्ट अश्रू निर्माण करणारे थेंब दूर आणि वेगाने थेट तुमच्या चेहऱ्याकडे वाहून नेतात.
डोळ्यातून पाणी येऊ नये म्हणून काय करावे?
धारदार चाकू केवळ सुरक्षित आणि अधिक कार्यक्षमच नाही, तर तुमच्या डोळ्यातले अश्रुही थांबवू शकतो. संशोधकांनी नियमित धारदार सुरू वापरण्याचा आणि हळूवारपणे कांदा कापण्याचा सल्ला दिला आहे. तसंच स्वयंपाकघरातील व्हेंटखाली, सौम्य हवेच्या प्रवाहाजवळ कांदा कापल्याने एरोसोल तुमच्या डोळ्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच ते पसरण्यास मदत होऊ शकते.