ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या अनेकदा नवीन आणि भन्नाट ऑफर देत असतात. अनेक वेळा कंपन्या मजेदार उपक्रमही आयोजित करतात. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका आईस्क्रीम कंपनीने असा मजेशीर उपक्रम केला आहे, जो पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.यामध्ये ग्राहकांना फ्रीमध्ये आईस्क्रीम दिली जात होती मात्र टास्क असा होता की आधी डान्स मग आईस्क्रीम. बेंगळुरूमधील कॉर्नर हाऊस आईस्क्रीमद्वारे विनामूल्य आईस्क्रीमच्या भन्नाट ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती.

आईस्क्रीम कंपनीने ‘आईस्क्रीम डे’च्या निमित्ताने मोफत आईस्क्रीम देण्याचा निर्णय घेतला होता. दरवर्षी जुलै महिन्याच्या तिसऱ्या रविवारी आईस्क्रीम डे साजरा केला जातो. या अंतर्गत, बेंगळुरूमधील कॉर्नर हाऊस आइस्क्रीमने त्यांच्या स्टोअरफ्रंटपासून ते शॉप काउंटरपर्यंत नाचत येणाऱ्या ग्राहकांना फ्रीमध्ये आईस्क्रीमचे वाटप केले. ही ऑफर बेंगळुरूमधील कॉर्नर हाऊस आईस्क्रीमच्या इंदिरानगर शाखेत ठेवण्यात आली होती. बर्‍याच ग्राहकांनी वेगवेगळ्या शैलींमध्ये डान्स करत फ्रीमध्ये आईस्क्रिम मिळवलं. ग्राहकांचे नाचतानाचे व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून आता ते सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत. .

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – शाळा बनली आखाडा…सरकारी शाळेत शिक्षकच एकमेकांना भिडले; वादाचे तुंबळ हाणामारीत रुपांतर, VIDEO व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आइस्क्रीम ब्रँडने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या डान्सिंग ग्राहकांचे मजेदार व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत एक लाखाहून अधिक लाईक्स आले आहेत. या व्हिडिओमध्ये ग्राहक उत्साहाने नाचताना दिसत आहेत आणि शेवटी नाचणाऱ्या ग्राहकांना आईस्क्रीम मोफत देण्यात आले. या व्हिडिओवर अनेक युजर्सनी कमेंटही केल्या आहेत. एका वापरकर्त्याने ‘फुकट काहीही करू’ अशी कमेंट केली. त्याचवेळी दुसऱ्या युजरने ‘ही ऑफर अजूनही सुरू आहे का’ अशी कमेंट केली.