डी-मार्ट १७व्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांना २५०० रुपयांची मोफत ‘शॉपिंग व्हाऊचर’ देण्यात असल्याची बातमी दोन दिवसांपासून व्हॉट्सअॅपवर फिरत आहे. यासाठी ‘डी-मार्ट इंडिया’ या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन संदेशाच्या माध्यमातून केले जात आहे. परंतु ही बातमी फसवी आहे. डी-मार्टच्या वतीने अशी कोणतीही योजना सुरू करण्यात आली नसल्याचे लगेचच जाहीर करण्यात आले.
लोकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने काही लोक अशा योजना समाजमाध्यमांवरून पसरवत आहेत. यात ते ‘डी-मार्ट’च्या नावाने कूपन्स विकत असतात. या साऱ्या कूपन्स बनावट असतात. त्यामुळे नागरिकांना आर्थिक नुकसान पोहोचू शकते. त्यामुळे अशा फसव्या संदेशांच्या आधारे कोणत्याही योजनेला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
