Dahi handi video: मुंबई, ठाण्यात दहीहंडी सणाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक गोविंदा पथके आणि त्यातील बालगोपाळ विविध ठिकाणाच्या प्रसिद्ध, मानाच्या हंड्या फोडतात. अनेक गल्लीबोळांत नाक्या-नाक्यावर, रस्त्यांवर ‘गोविंदा आला रे आला’चे सूर ऐकू येत आहेत. सोशल मीडियावरही दहीहंडीचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतायत. अशातच एक जुना व्हिडीओ व्हायरल होतोय; जो पाहिल्यानंतर आजही अनेकांना आपले हसू आवरणे कठीण होते. हा व्हिडीओ जुना असला तरी दरवर्षी दहीहंडीदरम्यान तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो.
देशभरात दही हंडीचा उत्साह पाहायला मिळाला. सोशल मीडियावर दही हंडी फोडतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच सहभाग व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. सध्या असाच एक दही हंडी फोडतानाचा व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरुन हसाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण दही हंडीच्या उत्सवात नारळाने दही हंडी फोडताना दिसत आहे पण खूप प्रयत्न करुनही त्याच्या हातून मडकं फुटेना. त्यानंतर आणखी एक तरुण पूर्ण ताकदीने नारळाने ही दही हंडी फोडण्याचा प्रयत्न करतो पण तो सुद्धा अयशस्वी ठरतो. यानंतर मडकं फोडताना चुकून ते मडकंच थेट लहान मुलीच्या डोक्यावर पडतं आणि फुटतं. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ feedruiners नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत मांजरीचं कौतुक करत आहेत.
मुंबईसह ठाण्यात दहीहंडी उत्सवा मोठ्या थाट्यामाट्यात सुरु आहे. मुंबई आणि ठाण्यातील दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथक शर्थीचे प्रयत्न करत आहे. जय जवान यंदा तरी १० थर लावणार का याकडे लक्ष असताना कोकण नगर गोविंदा पथकाने १० थर रचून विश्वविक्रम केला आहे. हा थरार अनुभव ठाण्यातील प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठान दहीहंडी सोहळ्यात पाहिला मिळाला.