Viral Video: सोशल मीडियावर सतत विविध गोष्टींचा ट्रेंड सुरू असतो. मग ती गाणी असो किंवा एखाद्या डान्सचा व्हिडीओ याबाबत सतत विविध गोष्टी व्हायरल होत असतात. व्हायरल झालेली गाणी, डायलॉग किंवा डान्स स्टेप्सवर लोक मोठ्या प्रमाणात रील्स बनविताना दिसतात. मागील काही महिन्यांपासून सोशल मीडियावर अनेक गाणी तुफान चर्चेत आहे. त्यात ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘अंगारों का अंबर सा’ गाणं खूप चर्चेत आलं. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही या गाण्यावर सुंदर डान्स पाहायला मिळत आहे.

शाळा, कॉलेज म्हटलं की, आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू येतं. कारण- ते दिवस कधीही न विसरण्यासारखे असतात. शाळा, कॉलेजात केलेला अभ्यास, मजा-मस्ती, भांडणं नेहमीच प्रत्येकाच्या आठवणीत घर करून राहतात. त्याशिवाय तिथल्या गोड गमती-जमती आणि मित्र-मैत्रिणी, वार्षिक समारंभात केलेला डान्स नेहमीच आपल्या स्मरणात असतो. सध्या एका कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा सुंदर कपल डान्स व्हायरल होतोय, जो पाहून तुम्ही कौतुक कराल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा आणि मुलगी स्टेजवर डान्स करण्यासाठी जातात. यावेळी ते ‘अंगारों का अंबर सा…’ गाण्यावर डान्स करतात. गाण्याच्या सुरुवातील मुलगी नाचायला सुरुवात करते. त्यानंतर दोघेही मिळून या गाण्याची हुक स्टेप करतात. त्यांचा हा डान्स सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @iamyouralokk या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत तीन दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक नेटकरी यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकाने लिहिलंय, “तिला नीट नाचता येत नसूनही त्यानं खूप समजून घेतलं”. दुसऱ्यानं लिहिलंय, “खूप छान नॅचरल परफॉर्मन्स”. तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “खूप सुंदर”. आणखी एका युजरनं लिहिलंय, “कॉलेजचे दिवस आठवले”.