Viral video: लेक माहेराच सोनं, लेक सौख्याच औक्षण, लेक बासरीची धूण, लेक अंगणी पैंजण…मुलींना परकं धन समजलं जातं, कारण एक दिवस ती माहेरचं घर आणि नाव सोडून सासरी नांदायला जाते. पण आईवडीलांच्या मनातील मुलीचं स्थान मात्र कायम राहतं. मुलीची जागा कोणताही मुलगा घेऊ शकत नाही. मुली नेहमीच आईवडीलांची सेवा करताना दिसतात. जी पोरगी आयुष्यभर आई-बापाच्या कुशीत वाढली, जिला हवं ते मिळत होते, ती एका क्षणात दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी होते.ज्या माहेरच्या घरात मुलगी लहानाची मोठी होते, त्या घरातून काढता पाय घेताना कोणत्याही मुलीचे अंतकरण जड होते. माहेरातून सासरच्या घरी निघतानाचा हा हळवा प्रसंग प्रत्येक घरात अनुभवायला मिळतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लग्न आणि त्यानंतरचे सर्व विधी आटोपून येणारा निरोपाचा क्षण नववधूच्या मातापित्यासह सर्वांनाच जड जातो. महिने-दोन महिने लग्नाच्या गडबडीत सहज निघून जातात मात्र शेवटच्या क्षणी सगळ्यांचाच कंठ दाटून येतो. अशाच एका लेकिच्या पाठवणीला आई-वडिलांचा कंठ दाटून आलाय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आई-वडिल आपल्या लेकीला घेऊन मांडवाच्या एका बाजूला धायमोकलून रडताना दिसत आहेत. मुलीच्या जन्मावेळी ती लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या संसारात आल्याचा आनंद व्यक्त केला जातो. मात्र ज्यावेळी हीच मुलगी परक्या अर्थात सासरच्या घरात नांदायला जाते, त्यावेळी मुलीचे संपूर्ण कुटुंबच भावनिक होते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Video: “२ कोटींचा बंगला, २५ लाखांची FD अन्…”; लेकीच्या लग्नासाठी वडिलांची मोठी ऑफर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट करत आपल्या लेकीच्या पाठवणीचे क्षण आठवत आहेत. हा व्हिडीओ @Gulzar_sahab या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. एका युजरने यावर “कन्यादान” अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका युजरने लेक प्रत्येकाच्या नशिबी नसते, लेक माहरेचं सोनं असते. अशी कमेंट केलीय.