मुलांच्या इच्छा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी पालक सतत मेहनत करत असतात. आपल्या मुलाला जगातील सर्व सुख मिळावे अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. त्या बदल्यात कशाचीही अपेक्षा न ठेवता पालक मुलांसाठी करत असतात. मुलांच्या गरजा कोणतीही गोष्ट न सांगता पूर्ण करत असतात. मग मुलांनी मोठं होऊन आपल्या पालकांसाठी काही वेगळं का करू नये? अशातच मुली सुद्धा आता कुठे कमी नाहीत. मुली नेहमीच आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करतात, मात्र लग्न झालं की हेच घर आई वडिलांना सोडून त्यांना जावं लागतं. प्रत्येक मुलगी लग्न करुन वेगवेगळ्या ठिकाणी जातो. अशावेळी जबाबदाऱ्यांमुळे सर्व बहिणींना एकत्र भेटणे शक्य होत नाही, मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मुलींनी त्यांच्या बाबांना चांगलंच सरप्राईज दिलंय..हा व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील.

लग्न करुन गेलेल्या चिमण्यांची आई वडिल नेहमीच आतुरतेने वाट बघत असतात. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता या मुलींनी त्यांच्या वडिलांना रिटायरमेंटच्या दिवशी भन्नाट सरप्राईज दिलंय. रिटायरमेंटच्या दिवशी सगळ्या मुली बऱ्याच वर्षानंतर एकत्र वडिलांना भेटायला आल्या आहेत. आणि याची त्यांना काहीच कल्पना नाहीय. मात्र रिटायरमेंटच्या दिवशी आपल्या सर्व मुलींना एकत्र पाहून ते खूप भावूक झाले.एवढ्या वर्षानंतर आपल्या सगळ्या मुलींना एकत्र पाहून वडिलांना आनंदअश्रूही अनावर झाले. यानंतर सर्व मुली पुढे येतात आणि वडिलांना मिठी मारतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – समुद्रकिनारी बिकनीतील मुलींचे काढत होता video, तेवढ्यात बायकोनं मारली एन्ट्री अन्…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हायरल व्हिडिओ गुडन्यूज_मूव्हमेंट या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १.८ मिलियन इतके व्ह्यूज आले आहेत.