Lioness Escapes Hyena Attack, Watch Video : “शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ” अशी म्हण आपण अनेकदा ऐकतो. पण कधी कधी शक्तीपेक्षा मैत्रीही श्रेष्ठ ठरते, हे या जंगलातील एका थरारक घटनेत पुन्हा सिद्ध झालं आहे. संकटात धावून येतो तोच खरा मित्र असं मानलं जातं याची प्रचिती देणारा एक व्हिडिओ समोर आला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक सिंहीण तरसांच्या टोळीच्या कचाट्यात सापडते. ती एकटीच त्यांचा सामाना करते पण शेवटच्या क्षणी अस काही घटतं की रणभूमीचं चित्रच बदलून जाते. शेवटच्या क्षणी जे घडले त्यामुळे तरसांची पळता भुई थोडी झाली. हा थरारक प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला असून, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.”

इंस्टाग्रामवर AMAZlNGNATURE नावाच्या पेजवर ही हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की एक पठारावर दूरपर्यंत हिरवळ पसरलेली आहे. ज्यामध्ये छोट्या छोट्या झुडुपांमध्ये काही प्राणी दडलेले दिसत आहे. ते धावत धावत जसे कॅमेऱ्याच्या दिशेने येतात तसे लक्षात येते की, एका एकट्या सिंहि‍णीला पाहून तरसांच्या टोळीने तिला शिकार करण्याचा डाव आखते. सिंहीण जीव वाचवण्यासाठी धावत असते पण तेवढ्यात सर्व तरस तिच्यावर हल्ला करतात आणि एकाच वेळी सर्वजण तिच्या अंगावर तुटून पडतात. सुरुवातीला सिंहीण पूर्णपणे एकटी लढत आहे. त्या तरसांनी तिला चारही बाजूंनी घेरलं पण ती हार मानत नाही ती प्रतिकार करत राहते. सुरुवातीपासूनच धाडस दाखवत एकटीने लढण्याचा प्रयत्न केला. काही काळासाठी असे वाटते की वाटलं की, “आता तिचा जीव जाणारच!” पण अचानक तिच्या मदतीसाठी इतर सिंहि‍णी तिथं धावत येतात. एका क्षणात बाजी पलटते. सर्व सिंहि‍णी मिळून तरसांवर जोरदार हल्ला करतात आणि क्षणात तरस तेथून धूम ठोकून पळतात. एका सिंहि‍णीच्या धैर्यामुळे आणि इतर सिंहि‍णींच्या मदतीमुळे तिचा जीव वाचला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी या सिंहि‍णीच्या धाडसाचं आणि त्यांच्या मैत्रीचे कौतुक केलं आहे. “संकटात खरी मैत्री ओळखता येते,” असं अनेकांनी म्हटलं आहे. हा थरारक व्हिडिओ पाहून प्रेक्षक भारावून गेले आहेत.