Deer Viral Video: समाज माध्यमांवर नेहमी विविध व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात. ज्यात अनेकदा प्राण्यांचे व्हिडीओ पाहायला मिळतात. बऱ्याचदा जंगलातील प्राण्यांच्या या व्हिडीओंमध्ये ज्यात कधी हिंस्र प्राणी इतर प्राण्याची शिकार करताना दिसतात तर अनेकदा काही प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये मगर हरणाच्या पिल्लावर हल्ला करताना असं काहीतरी होत जे पाहून नेटकरीही अवाक् झाले आहेत.

जगात आई एवढे प्रेम तिच्या मुलांवर कोणीही करत नाही. मग ती आई एखादी व्यक्ती असो किंवा प्राणी, आई नेहमीच प्रत्येक गोष्टीत स्वतःआधी आपल्या लेकरांचा विचार करते. स्वतः उपाशी राहून आपल्या मुलांचे पोट भरते. आईच्या तिच्या मुलांवरच्या प्रेमाची एक नाही लाखो उदाहरण आहेत. ज्यातून मुलांबद्दलचे निस्वार्थ प्रेम दिसून येते. सध्या जंगालातील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय ज्यात एक हरीण आपल्या जीवाची पर्वा न करता पिल्लाला वाचवण्यासाठी असं काही करते जे पाहून नेटकरी कमेंट्स करताना दिसत आहेत.

Tiger effortlessly jumps across the river with a single leap Tiger Crossing River By Jump Animal Video
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! जंगलाच्या राजाचा ‘हा’ VIDEO पाहून कळेल आयुष्य कसं जगायचं
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
silver button of YouTube in the hand of a monkey
आईशप्पथ, चक्क माकडाच्या हातात यूट्यूबचे सिल्व्हर बटण… VIDEO पाहून नेटकरीही झाले शॉक!
Dog Viral Video
‘सांगा, हे योग्य की अयोग्य?’ चक्क श्वानाच्या अंगावर लावली लायटिंग… VIDEO पाहून व्हाल अवाक्
Tragic shocking Video: 4-Yr-Old Girl Drowns In Ganga As Her Aunt Makes Instagram Reel In UP’s Ghazipur
Shocking video: रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; ती बुडत होती अन् आई-मावशी रील बनवत राहिल्या…
Leopard's tactics for monkey hunting
युक्तीने साधला डाव! माकडाच्या शिकारीसाठी बिबट्याचा डावपेच; VIDEO पाहून अंगावर येईल काटा
students revealing the contents of their lunch boxes
Viral Video: ‘जिलेबी देणाऱ्या आईला भेटायचंय…’ चिमुकल्यांच्या डब्यातील पदार्थ पाहून तुम्हीही व्हाल थक्क; म्हणाल, ‘आमच्या वेळी…
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल

हा व्हायरल व्हिडीओ एका जंगलातील असून यामध्ये तुम्ही पाहू शकता, एका हरणाचे पिल्लू पाण्यात पोहत असताना यावेळी मगर हरणाच्या पिल्लाची शिकार करणार असल्याचे स्पष्ट होते, तेव्हाच पिल्लाची आई मगर आणि तिच्या पिल्लाच्या मध्ये येऊन थांबते आणि पिल्लाचा जीव वाचवते. मगरी पिल्लाऐवजी आईवर हल्ला करते. ज्यामुळे पिल्लाचा जीव वाचतो आणि आई आपला जीव गमावते. या हृदयस्पर्शी व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

हेही वाचा: “अरे बापरे, तो आला आणि तिला चक्क…” माकडाने महिलेबरोबर केलं असं काही… VIDEO पाहून नेटकरी झाले शॉक

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ युट्यूबवरील @Info Therapy या अकाउन्टवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर आतापर्यंत दोन लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून यावर तीन हजाराहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करताना देखील दिसत आहेत.

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “आईचे प्रेम खूप अनमोल आहे, याची तुलना कधीच कोणासोबत होऊ शकत नाही.”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “आईने मृत्यूपूर्वी बाळाकडे प्रेमाने पाहिलं.”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “हा व्हिडीओ पाहून मला खूप रडू आलं”, तर चौथ्या युजरने लिहिलंय की, “मला खूप वाईट वाटलं हे पाहून”