Viral Video : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली मेट्रोतील अनेक घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रवाशांचा डान्स, महिलांचे आपआपसातील भांडण, कपल्सचा रोमान्स अशा अनेक घटनांच्या व्हिडीओमुळे दिल्ली मेट्रो सध्या चर्चेत आहे. अशातच मेट्रोतील आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की चालत्या मेट्रोमध्ये एक तरुणी एका तरुणाच्या समोर जाते आणि त्याला दोन चार थापड मारते. त्यानंतर ती त्याला चांगलीच सुनावताना दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तरुण मात्र शांतपणे तिचे ऐकताना दिसत आहे.

हेही वाचा : नवरीच्या गळ्यात वरमाला टाकण्याआधीच तुटली, भर मांडवात नवरदेवाने केले असे काही… व्हिडीओ पाहा

मेट्रोत बसलेले प्रवासी हे संपूर्ण प्रकरण पाहतच राहिले. कोणत्याच प्रवाशांनी या दोघांच्या भांडणामध्ये हस्तक्षेप केलेला नाही. या भांडणादरम्यान मेट्रो एका स्टेशनवर थांबते आणि काही प्रवासी आतमध्ये येतात पण मुलगी मात्र मुलाबरोबर भांडण करण्यात इतकी मग्न असते की तिचे कोणाकडेही लक्ष नसते.

@gharkekalesh या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनध्ये लिहिले आहे. “दिल्ली मेट्रोमध्ये मुला मुलीचे भांडण, मुलीने मुलीला मारली सर्वांसमोर थापड.. विचार करा, याच्या उलटे झाले तर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी तरुणीचे असे वागणे बरोबर नसल्याचे लिहिले आहे तर काही युजर्सनी तरुणाने काही चुकीचे केले असावे, असे लिहिले आहे.