पोलिसांवर समाजात कायदा व सुव्यवस्थेचे पालन केले जावे याची जबाबदारी असते. यासाठी त्यांना दिवसरात्र मेहनत घ्यावी लागते. त्यांच्या कर्तव्यनिष्ठतेची अनेक उदाहरणं तुम्ही पाहिली, ऐकली असतील. पण इतकी मोठी जबाबदारी पेलताना पोलिसांना स्वतःसाठी वेळ काढणे खुप कठीण होत असेल. अशात त्यांना असणारे छंद जोपासायलाही त्यांना वेळ मिळत नसेल. पोलिसांचे विविध कौशल्य दाखवणारे अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक पोलीस अधिकारी कारमध्ये गिटार वाजवत ‘तु मेरा कोई ना होके भि कुछ लागे…’ हे अरजित सिंगचे प्रसिद्ध गाणे गात आहे. या पोलिसाच्या मधुर आवाजाने नेटकऱ्यांना भुरळ पाडली आहे. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.
आणखी वाचा- Video: गरीब मुलांना दुकानाबाहेर रोज टीव्ही पाहत असलेले पाहून दुकानदाराने केलेली कृती होतेय Viral
व्हायरल व्हिडीओ:
आणखी वाचा: वाघाचा फोटो काढण्याचा मोह आवरला नाही अन्…; थरकाप उडवणारा Viral Video एकदा पाहाच
या व्हायरल व्हिडीओने नेटकऱ्यांची मनं जिंकली असून, अनेकांनी या पोलीस अधिकाऱ्याच्या मधुर आवाजाचे कौतुक केले आहे. या व्हिडीओला ८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.