School Boy Viral Video: आठवडापूर्वी देशभरात ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या दिवशी जागोजागी तिरंगा ध्वज फडकवून स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा केला गेला. शाळा, महाविद्यालयांमध्येही स्वातंत्र्य दिवसासाठी खास कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सध्या सोशल मीडियावर या दिवसाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यात काही जण सुंदर डान्स करताना; तर काही जण गाणी गाताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलगा भाषण करताना दिसतोय.

शहरातील मोठमोठ्या शाळांतील विद्यार्थी असोत किंवा एखाद्या खेडेगावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी असोत; प्रत्येकामध्ये काही ना काही कला असते. सोशल मीडियावर जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांचे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. त्यात विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारच्या कला सादर करताना दिसतात. त्यामध्ये कधी ते सुंदर डान्स करताना; तर काही जण सुंदर भाषण करताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील मुलगा भाषण करताना दिसतोय. पण यावेळी तो असं काहीतरी बोलतोय, जे ऐकून तुम्हाला हसू येईल.

नक्की काय घडलं व्हिडीओमोध्ये?

या व्हायरल व्हिडीओ एका खेडेगावातील असून, यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांमधील कलागुण सादर करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेतला पहिलीच्या वर्गातील चिकू नावाचा मुलगा सर्वांसमोर त्याची दिनचर्या सांगतो. यावेळी तो त्याची संपूर्ण दिनचर्या मजेशीर पद्धतीने सांगतो आणि त्यामुळे समोर बसलेले शाळेतील विद्यार्थी मोठमोठ्याने हसतात. सध्या हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सध्या हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @lahuborate या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत सहा लाखांहून अधिक व्ह्युज आणि ११ हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत.

हेही वाचा: नाद करायचा नाय! भररस्त्यात दोन श्वानांची फायटिंग; VIDEO पाहून पोटधरुन हसाल

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Lahu Borate (@lahuborate)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय, “प्रत्येक शाळेत असा एकतरी नमुना असतो.” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “भावा, तू समोर जाऊन उभा राहिलास हीच खूप मोठी गोष्ट आहे.” तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “हे उत्कृष्ट धाडस सर.” चौथ्या युजरनं लिहिलंय, “व्यक्त व्हायला शिकलं पाहिजे. खूप छान.”