मला आयुष्यात पैसेच कमवायचे नाहीत, असे म्हणणारे लोक तुम्हाला फार क्वचितच सापडतील. प्रत्येकाला आयुष्यात चांगले पैसे कमावण्याची इच्छा असते. काहींना भरपूर पैसा कमावून झटपट श्रीमंत व्हायचे असते. अशा परिस्थितीत पैसे कमावण्यासाठी लोक वेगवेगळ्या गोष्टी करीत असतात. कोणी दुकान उघडतो, कोणी नोकरी करतो, कोणी पैशांची गुंतवणूक करतो, तर कोणी आणखी काही वेगवेगळ्या गोष्टी करीत असतो. असे म्हणतात ना संधी मिळत नसते, तर ती निर्माण करावी लागते. तसेच काहीसे पैशांच्या बाबतीत आहे. पैसे कमावण्यासाठी तुम्हाला कोणी आयती संधी देणार नाही, तर ती तुम्हाला स्वत: निर्माण करावी लागेल. अशाच प्रकारे एका व्यक्तीने पैसा कमावण्यासाठी अशी एक पद्धत वापरली आहे; जी पाहून तुम्ही डोकेच धराल. अशा प्रकारेही पैसे कमावता येऊ शकतात, असा कोणी विचारही केला नसेल. पण, त्याने संधीचे सोने करीत पैसे कमावण्यास सुरुवात केली.

तुम्ही कोणत्याही महामार्गावर गेलात, तर मध्यभागी रस्तादुभाजक (डिव्हायडर) असतो हे आतापर्यंत अनेकदा तुमच्या पाहण्यात आले असेल. या रस्तादुभाजकाच्या दोन्ही बाजूंनी वाहने ये-जा करीत असतात. महामार्गावर रस्तादुभाजक असल्याने एकही वाहन यूटर्न वगैरे घेण्यासाठी मधेच थांबत नाही आणि प्रवासीही मधेच उतरत नाहीत. कारण- महामार्गावर वाहने इतक्या वेगाने जात असतात की तुम्ही मधेच थांबलात, तर अपघात होणार हे निश्चित असते.

पण, व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काही वेगळेच पाहायला मिळाले. एक व्यक्ती महामार्गाच्या मध्यभागी रस्तादुभाजकाजवळ दोन शिड्या लावून उभी आहे. यावेळी महामार्गाच्या मधेच गाडीतून उतरणारे लोक त्या शिड्या चढून रस्तादुभाजक ओलांडत आहेत. पण, रस्तादुभाजक ओलांडण्यासाठी म्हणून शिडीचा वापर करणाऱ्या लोकांकडून तो पैसे घेत आहे. अशाने लोकांना कमी मेहनतीत रस्ता ओलांडता येतो; पण यातून ती व्यक्ती मात्र चांगले पैसे कमावतेय. मात्र, अशा प्रकारे रस्ता ओलांडणे जीवघेणे ठरू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा व्हायरल व्हिडीओ

https://x.com/Gulzar_sahab/status/1769376705037156660?s=20

हा व्हिडीओ @Gulzar_sahab नावाच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर)वरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करीत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “याला म्हणतात व्यवसाय.” हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिलाय. त्यावर एका युजरने लिहिलेय, “कमावणारे गंगेच्या लाटा मोजूनही कमवू शकतात.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “हे जीवघेणे काम आहे.”