Desi Jugaad Video Viral : भारतात जुगाडू लोकांची काही कमतरता नाही, जिथे एखादं काम पूर्ण करण्यासाठी काहीच मार्ग नसतो तिथे एखादा जुगाड करून काम पूर्ण केलं जातं. अनेकदा असे जुगाड बघून आश्चर्यचकित व्हायला होते. सध्या असाच एक जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक व्यक्ती हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असल्याने बेडवर झोपलीय, त्याच्या एका हाताला सलाईन लावलेय; पण अशा अवस्थेतही मोबाईल वापरण्यासाठी त्यानं असा एक जुगाड शोधून काढलाय की, ते पाहून तुम्ही चकित व्हाल.
हॉस्पिटलमध्ये दाखल होताच डॉक्टर आपल्याला आराम करण्याचा सल्ला देतात, जेणेकरून आपल्याला लवकर बरं वाटेल; पण काही लोकांची आजारपणातही मोबाईल वापरण्याची हौस काही कमी होत नाही. अशाच एका रुग्णानं तो बेडवर झोपला असताना मोबाईल वापरण्यासाठी एक जबरदस्त जुगाड शोधून काढला आहे, जो पाहून सर्वच आश्चर्य व्यक्त करतायत.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती हॉस्पिटलच्या बेडवर अॅडमिट झाली आहे. यावेळी ती बेडवर झोपून आरामात मोबाईल वापरतेय. पण, मोबाईल वापरण्यासाठी त्या व्यक्तीनं असा काही जुगाड केलाय की, ते पाहून तुम्ही डोकंच धराल.
या रुग्णानं प्रथम मोबाईलचं कव्हर काढलं. त्यानंतर ते कव्हर पँटच्या आत टाकलं आणि ते मांडीच्या बाजूनं वर आणलं. नंतर त्या कव्हरमध्ये पुन्हा मोबाईल अडकवला. अशा प्रकारे त्यानं कव्हर पँटला अडकवून मोबाईल वापरण्याचा आनंद घेतला. असं केल्यामुळे त्याला मोबाईल हातात पकडण्याची गरजही भासली नाही आणि सलाईन लावलेला हात दुखण्याचं टेन्शनही राहिलं नाही.
रुग्णाचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @Rupali_Gautam19 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आ, जो हजारो लोकांनी पाहिलाय आणि अनेकांनी त्यावर भन्नाट कमेंट्सही केल्यात. एका युजरने लिहिले की, भावानं त्याची मोबाईल वापरण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी काय जुगाड केला आहे. दुसऱ्याने लिहिले की, तुम्ही काहीही म्हणा, या भावाचा जुगाड हिट आहे आणि म्हणूनच तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिसऱ्याने लिहिले की, भाईसाहब, या व्यक्तीचा जुगाड खरोखरच अद्भुत आहे, काय डोकं लावलं त्यानं.