Desi jugad Viral video: भारतीय नागरिक कचऱ्यातून विश्व घडवण्यात चतुर असतात. एखादी वस्तू उपयोगी नाही, असे आपल्या देशात क्वचितच घडते. भारतात जुगाडू लोकांची काहीच कमतरता नाही. भारतीय लोक असे असे जुगाड शोधून काढतात की जे पाहून मोठमोठे इंजिनियर्स आपल्या डिग्र्या फाडतील. सोशल मीडिया विविध व्हिडिओंनी भरलाय. अनेक विनोदी व्हिडिओ आपण इथे रोज पाहत असतो. त्यातले काही व्हिडिओ आपल्याला खळखळून हसवतात. याच प्रकारात येतात जुगाडा व्हिडिओ. स्वत:च डोकं चालवून असं काहीतरी केलं जातं, की मग सोशल मीडियावरचे यूझर्स या जुगाडुंना डोक्यावर घेतात.

मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाने आपला पार चढवायला सुरुवात केली आहे. ऊन आणि गरमीपासून वाचण्यासाठी लोकं बाहेर जाणे टाळून घरीच राहणे पसंत करत आहेत. परंतु महत्त्वाच्या कामासाठी घर सोडावेच लागते. पण असेही काही लोक आहेत जे उन्हापासून वाचण्यासाठी काही ना काही शक्कल लढवतातच. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

जुगाडूगीरीमध्ये आपल्या भारतीयांचा हात कोणीच धरू शकत नाही. कारण आपली लोकं असे असे जुगाड शोधून काढतात की पाहणारा सुद्धा अवाक होतो. आता हाच जुगाड पाहा ना..एका तरुणानं चक्क ३६० अंशात फिरणारा पंखा तयार केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल एवढं नक्की. कारण हा पंखा फक्त घरातच नाहीतर बाहेरच्या परिसरतही गारवा देत आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारा पंखा बघायला साधासुधा वाटतो आपल्या घरामध्ये असतो तसाच तीन पात्यांचा पंखा आहे. पण या तरुणानं तो ज्या पद्धतीने लावण्यात आलाय, त्या लोखंडी अँगलमध्ये. हा अँगल खास काटकोनात बसवलेला असून जवळपास १८० अंशांमध्ये फिरण्याची क्षमता त्यात आहे. यामुळे, पंख्याचा वारा घरात असो वा अंगणात आपल्याला हवं असेल त्याठिकाणी आपण तो फिरवून घेऊ शकतो.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Adeel Balouch (@adeel_balouch)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ adeel_balouch या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर कमेंट करून लोक मस्करी करत आहेत. एका यूजरने लिहिलं, वाहह एक नंबर, तर आणखी एकानं, हे फक्त भारतीयच करु शकतात असं लिहलं आहे.