Desi jugad Viral video: भारतीय नागरिक कचऱ्यातून विश्व घडवण्यात चतुर असतात. एखादी वस्तू उपयोगी नाही, असे आपल्या देशात क्वचितच घडते. भारतात जुगाडू लोकांची काहीच कमतरता नाही. भारतीय लोक असे असे जुगाड शोधून काढतात की जे पाहून मोठमोठे इंजिनियर्स आपल्या डिग्र्या फाडतील. सोशल मीडिया विविध व्हिडिओंनी भरलाय. अनेक विनोदी व्हिडिओ आपण इथे रोज पाहत असतो. त्यातले काही व्हिडिओ आपल्याला खळखळून हसवतात. याच प्रकारात येतात जुगाडा व्हिडिओ. स्वत:च डोकं चालवून असं काहीतरी केलं जातं, की मग सोशल मीडियावरचे यूझर्स या जुगाडुंना डोक्यावर घेतात.
असे अनेकजण आहेत जे काही ना काही शक्कल लढवतातच. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.जुगाडूगीरीमध्ये आपल्या भारतीयांचा हात कोणीच धरू शकत नाही. कारण आपली लोकं असे असे जुगाड शोधून काढतात की पाहणारा सुद्धा अवाक होतो. आता हाच जुगाड पाहा ना..एका तरुणानं चक्क अशी गोष्ट करुन दाखवली आहे ज्याचा आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल.
या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एक तरुण आपल्या बाईकवर बसलेला दिसत आहे. यावेळी त्याने त्याच्या हातात एक टीव्ही पकडली असून तो फार निरखून या बाईकला पाहत असतो. आपल्याला काही कळेल याआधीच तरुण ही टीव्ही एका हेल्मेटप्रमाणे आपल्या डोक्यावर बसवतो आणि आपली बाईक घेऊन तिथून निघून जातो. त्याचा हा अनोखा जुगाड पाहून लोक आता यावर आश्चर्य व्यक्त करत आहेत. तरुणाला हेल्मेट मिळालं नसाव, म्हणून त्याने टीव्हीलाच आपले हेल्मेट बनवले अशा मिश्किल प्रतिक्रियाही व्हिडिओला मिळत आहेत. तर तरुणाने हे नक्की केले कसे असा प्रश्नही काहींच्या मनात संभ्रम निर्माण करत आहे. दरम्यान तरुणाचा हा प्रकार हटके असला तरी खऱ्या आयुष्यात असं करणं अनेक दुर्घटनांना आमंत्रण देऊ शकतं, यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जाऊ शकते.
हा व्हिडीओ @Pra7oel या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर कमेंट करून लोक मस्करी करत आहेत. एका यूजरने लिहिलं, वाहह एक नंबर, तर आणखी एकानं, हे फक्त भारतीयच करु शकतात असं लिहलं आहे.
