Premium

मोलकरणीने लघवीने पुसलं मालकाचं घर, CCTV मुळे झाला खुलासा, पोलिसांना म्हणाली, “मी काम…”

Desi Maid Viral Video: सध्या जे प्रकरण चर्चेत आहे ते पाहता राग, किळस व भीती एकत्र वाटू लागते. एका प्रतिष्ठित इमारतीत एक कुटुंब जिच्या भरवश्यावर घर सोडून बाहेर गेले आहे त्याच मोलकरणीने…

Desi Maid Pees In Bucket And Mops House Dirty CCTV Video Goes Viral Police Arrest From Delhi Ajnara Society Shameless act
मोलकरणीने लघवीने पुसलं मालकाचं घर, CCTV मुळे झाला खुलासा (फोटो: ट्विटर)

Viral Maid of Ajnara Homes Society: अलीकडे बहुतांश घरांमध्ये कामात मदतीसाठी मोलकरीण किंवा हाऊस हेल्प असतेच. एखादी चांगली हाऊस हेल्प शोधणे म्हणजे गवतात सुई शोधण्यासारखे कठीण आहे. मेट्रो शहरांमध्ये तर या कामाचे मोठे मोल भरावे लागते आणि तरीही अनेकदा कामाच्या बाबत हलगर्जीच झाल्याची तक्रार मालक करत असतात. कदाचित दुर्दैवाने तुम्हालाही हा अनुभव आला असेल. पण सध्या जे प्रकरण चर्चेत आहे ते पाहता राग, किळस व भीती एकत्र वाटू लागते. एका प्रतिष्ठित इमारतीत एक कुटुंब जिच्या भरवश्यावर घर सोडून बाहेर गेले आहे त्याच मोलकरणीने घृणास्पद कृत्य केल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ग्रेटर नोएडा वेस्टच्या अजनारा होम्स सोसायटीमध्ये एका अपार्टमेंटची साफसफाई करणाऱ्या एका मोलकरणीने संपूर्ण घर स्वतःच्या स्थान लघवीयुक्त पाण्याने पुसून काढल्याचे समोर येत आहे, अपार्टमेंटमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे महिलेचे हे वर्तन पकडले गेले. हे फुटेज पहिल्यांदा सोशल मीडियावर समोर आले होते आणि झपाट्याने व्हायरल होत होते.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फुटेजमध्ये ही महिला सुमारे ३० सेकंद अपार्टमेंटमधील लिव्हिंग रूम साफ करताना दिसली आहे. लादी पुसायचे कापड पाण्यात बुडवण्याआधी तिने बादलीत लघवी केली. पोलिस अधिकाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी संबंधित महिलेला ताब्यात घेतले आणि तिची चौकशी सुरू केली.

हे ही वाचा<< गौतमी पाटीलचं खरं आडनाव माहितेय का? पुण्यातून पदाधिकाऱ्यांचा थेट इशारा, “तुला उलटं पालटं…”

घडलेला सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे. बिसरख कोतवालीचे प्रभारी अनिल राजपूत यांनी सांगितले की, महिलेची चौकशी करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान, तिने कबूल केले की तिने लघवी केलेल्या पाण्याने लादी पुसली. ही महिला सुमारे सहा महिन्यांपासून अपार्टमेंटमध्ये काम करत होती. सहा महिन्यांपूर्वी, महिलेने मालकाकडे नोकरीची मागणी केली होती आणि त्यांनी तिला कामावर ठेवले होते. तिने तिच्या वागण्याचे समर्थन केलेले नाही किंवा काहीही कारणही सांगितले नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Desi maid pees in bucket and mops house dirty cctv video goes viral police arrest from delhi ajnara society shameless act svs