Dhanteras 2023 Shubh Muhurat for Shopping: दरवर्षी कार्तिक महिन्यात कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनतेरस हा सण साजरा केला जातो. शास्त्रानुसार, समुद्र मंथनद्वारे भगवान धन्वंतरी यांचा अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. या वर्षी धनतेरस १० नोव्हेंबर रोजी साजरा केला जात आहे. धनतेरसला धनत्रयोदशी असेही म्हणतात. या दिवशी माता लक्ष्मी, भगवान धन्वंतरी आणि कुबेर यांची पूजा केली जाते. याशिवाय या दिवशी सोने, चांदी, भांडी इत्यादींची खरेदी करणे शूभ मानले जाते. म्हणूनच, जर तुम्हीही धनत्रयोदशीच्या खास मुहूर्तावर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर योग्य वेळ जाणून घ्या.

धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदीसाठी शुभ मुहूर्त
हिंदू कॅलेंडरनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजे १० नोव्हेंबर रोजी दुपारी १२:२५ पासून दुसऱ्या दिवशी म्हणजे ११ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत खरेदीसाठी शुभ वेळ आहे.

25th April Panchang Marathi Rashi Bhavishya Thursday 48 Minutes Abhijaat Muhurta
२५ एप्रिल पंचांग: गुरुवारी ‘ही’ ४८ मिनिटे आहे अभिजात मुहूर्त; मेष ते मीन राशीला लक्ष्मी नारायण कसे देतील आशीर्वाद?
pink moon 2024
गुलाबी साडीचा विषय सोडा, आकाशात दिसणार चक्क ‘गुलाबी चंद्र’; आज पौर्णिमेला ‘या’ वेळेत पाहा ‘पिंक मून’
mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू; भाविकांना उत्सव मूर्तीचे दर्शन
hanuman jayanti 2024 date time shubh muhurat puja mantra and signification
Hanuman Jayanti 2024: २३ की २४ एप्रिल, यंदा हनुमान जयंती कधी आहे? जाणून घ्या योग्य तिथी, पूजेचा मुहूर्त, मंत्र आणि महत्त्व

धनत्रयोदशीला पूजेसाठी शुभ मुहूर्त
प्रदोष काळ- संध्याकाळी ५:३० ते रात्री ०८:०८ पर्यंत.
वृषभ काळ- संध्याकाळी ०५:४७ ते ०७:४७ पर्यंत.

धनत्रयोदशी लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त
धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मीसह कुबेर आणि धन्वंतरी यांची पूजा करण्याची परंपरा आहे. धनत्रयोदशीच्या लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त शुक्रवार, १० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ०५:४७ ते 0७:४७ पर्यंत असेल.

धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदीसाठी शुभ मुहूर्त
धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदी करायची असेल, तर संध्याकाळी ५:०७ ते ७:४३ या वेळेत खरेदी करता येईल.
प्रदोष काल- संध्याकाळी ५:३० ते रात्री ०८:०८ पर्यंत
वृषभ काळ- संध्याकाळी ०५:४७ ते ०७:४७ पर्यंत.

धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करा
धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. याशिवाय गणेश-लक्ष्मीची मूर्ती, मातीचा दिवा इत्यादी वस्तू खरेदी कराव्यात. याशिवाय तुम्ही श्री यंत्र, लक्ष्मी यंत्र इत्यादी खरेदी करू शकता. धनत्रयोदशीच्या विशेष प्रसंगी गोवऱ्या, संपूर्ण धणे, हळद, झाडू इत्यादी खरेदी करणे देखील शुभ मानले जाते.

(टिप – वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)