scorecardresearch

Premium

VIDEO: वयाने मोठ्या फॅनच्या पाया पडला महेंद्रसिंह धोनी; नेटकरी म्हणतात “जमिनीवर पाय असणारा क्रिकेटपटू”

Ms dhoni viral video: धोनीनने पुन्हा एकदा फक्त एक कृती करत चाहत्यांची मनं जिंकली आहेत. धोनीने नेमकं काय केलं, पाहा…

Dhoni touched a fan's leg..!? Netizens is in Shock video goes viral
धोनी महिलेच्या पाया का पडला?

Viral video: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु आहे. नुकताच धोनीच्या मुलाखतीचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्याचबरोबर आता धोनीने केलेली एक कृती चाहत्यांच्या मनात घर करुन गेली आहे. धोनीनं फक्त ही एक कृती करत सर्वांची मनं जिंकली आहेत. एमएस धोनी उत्तराखंडमधील त्याच्या मूळ गावी गेला होता. तिथला त्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्याचबरोबर धोनीचे चाहतेही हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. धोनीने नेमकं काय केलं, पाहा…

फक्त एक कृती करत चाहत्यांची मनं जिंकली

man kissed baby alligator viral video
तरुणाने चक्क मगरीच्या पिल्लाला Kiss केले आणि…; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “मूर्खासारखे…”
Sachin Dhas successful performance in U19 World Cup cricket tournament in South Africa sport news
वडिलांचा विश्वास सार्थकी लावताना बीडच्या सचिनची यशस्वी कामगिरी!
man killed his mother for opposing immoral relationship
वर्धा : अनैतिक संबंधास विरोध; मुलाने आईच्या डोक्यात घातला वरवंटा
key players injuries create major selection headache for India ahead of second test against england zws
अंतिम संघनिवडीची डोकेदुखी; महत्त्वपूर्ण खेळाडूंच्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीपूर्वी भारतासमोर पेच

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल असं नेमकं धोनीनं केलं तरी काय. काही लोक यशाच्या कितीही मोठ्या शिखरावर गेले तरी आपली सुरुवात कुठून झाली होती, हे विसरत नाहीत. धोनीही त्यातलाच एक, याआधीही धोनीचे पाय नेहमी जमिनीवरच असल्याची कित्येक उदाहरणं तुम्ही पाहिली असतील. त्यातलंच हे आणखी एक उदाहरण आता समोर आलं आहे. एमएस धोनी उत्तराखंडमधील त्याच्या मूळ गावी पोहोचला होता, जिथे तो गावातील रहिवाशांची बोलत होता, यावेळी एक महिला धोनीकडे आली असता धोनीने वयानं मोठ्या असलेल्या महिलेच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले. यानंतर महिलेनेही त्याला मिठी मारली. धोनीची ही एक कृती चाहत्यांच्या मनात घर करुन गेली

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओचे खूप कौतुक होत आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून, तो आतापर्यंत ३ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने पोस्टवर कमेंट केली की, “एकही तो दिल है माही भाई कितनी बार जितोगे”. तर दुसरा युजर म्हणतो “जमिनीवर पाय असणारा क्रिकेटपटू”

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “जस्ट लूकिंग लाईक अ वाव” मांजरीनंही फॉलो केला सुपरहिट ट्रेंड; VIDEO पाहून म्हणाल खरंच वाव…

सोशल मीडियात व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक कौतुकाच्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @daksh_papola या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर देत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dhoni touched a fans leg netizens is in shock video goes viral srk

First published on: 17-11-2023 at 13:15 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×