SC, ST Reservation, BJP Goevernment: लाईटहाऊस जर्नालिज्मला एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, अगदी देशातील प्रादेशिक भाषांमध्येही मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असल्याचे आढळले. भाजप सत्तेत आल्यास एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल, असे अमित शाह यांनी एका निवडणूक रॅलीत सांगितले आहे, असा दावा व्हिडिओसह करण्यात आला होता. काहीच दिवसांपूर्वी भाजपाचे आमदार मीणा यांचाही असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात त्यांनी भाजपा सत्तेत येताच आरक्षण रद्द करेन, कलम ३७० पुन्हा लागू करेल असं म्हटल्याचे सांगण्यात आलं होतं, तो व्हिडीओ तर अर्धवट कट करून शेअर केला जात होता पण अमित शाह यांच्या व्हिडिओमागे नेमकं खरं काय हे आता पाहूया..

काय होत आहे व्हायरल?

X यूजर Bhaskar Rasekar ने व्हायरल व्हिडीओ आपल्या प्रोफाइलवर शेअर केला होता.

इतर सोशल मीडिया यूजर्स देखील हाच व्हिडीओ आपल्या प्रोफाइल वर शेअर करत आहेत.

https://x.com/iprashant17/status/1784132810527346851

तपास:

आम्ही InVid टूलमध्ये व्हिडिओ अपलोड करून आमचा तपास सुरू केला. आम्ही त्याद्वारे मिळवलेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च केले. एनडीटीव्हीच्या वेबसाइटवर यापैकी एका कीफ्रेमवरून आम्हाला अमित शाह यांचा अचूक फोटो सापडला. व्हिडीओ २४ एप्रिल २०२३ रोजी अपलोड करण्यात आला होता आणि त्याचे शीर्षक होते: अमित शाह यांनी तेलंगणातील मुस्लिम कोटा रद्द करण्याचे वचन दिले

https://www.ndtv.com/video/news/news/amit-shah-vows-to-scrap-muslim-quota-in-telangana-695719

त्यानंतर आम्ही शीर्षकावर गूगल सर्च केले आणि आढळले की हि बातमी इतर माध्यम संस्थांनी सुद्धा दिली होती.

https://www.thehindu.com/news/national/telangana/amit-shah-terms-muslim-quota-in-telangana-as unconstitutional/article66770807.ece

https://www.news18.com/politics/unconstitutional-amit-shah-vows-to-scrap-muslim-quota-in-telangana-what-is-the-issue-how-does-it-play-in-polls-7620283.html

गूगल कीवर्ड सर्चद्वारे, आम्हाला V6 News Telugu वर व्हायरल होत असलेला अचूक व्हिडीओ सापडला.

हा व्हिडिओ एक वर्षापूर्वी अपलोड करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये अमित शाह मुस्लिम आरक्षणावर भाष्य करताना दिसत आहेत. अमित शाह यांच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेल्या या संपूर्ण भाषणाचा व्हिडीओही आम्हाला पाहायला मिळाला.

हा व्हिडिओ एक वर्षापूर्वी अपलोड करण्यात आला होता. १४ मिनिटे ३० सेकंदानंतर अमित शाह मुस्लिम आरक्षणाबाबत बोलताना दिसतात. ते म्हणतात, “भाजपला सत्तेवर आल्यास आम्ही हे असंवैधानिक मुस्लिम आरक्षण संपवू. तेलंगणातील एससी, एसटी आणि ओबीसी समुदायांना ज्या संधी मिळाव्यात, त्याच संधी मुस्लिम आरक्षण संपवून त्यांना दिल्या जातील.” सत्तेत आल्यास एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षण संपुष्टात आणू असे अमित शहा यांनी संपूर्ण भाषणात कुठेही म्हटलेले नाही.

दरम्यान, सध्या व्हायरल होत असणाऱ्या या एडिटेड व्हिडीओवर भाजपाने गुन्हा दाखल केला आहे.

https://www.indiatoday.in/india/story/fir-delhi-police-bjp-flags-amit-shah-doctored-fake-video-on-scrapping-reservation-2532825-2024-04-28

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या व्हिडीओवरून दिल्ली पोलिसांकडे रविवारी एफआयआर नोंदवण्यात आली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निष्कर्ष: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा व्हायरल व्हिडिओ ज्यामध्ये ते भाजप सत्तेत आल्यास ते एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षण संपुष्टात आणतील असं म्हटल्याचा दावा केला जात आहे, हा एडिटेड आहे. व्हायरल दावा खोटा आहे. या प्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात आला आहे.