अभिनेत्री जया बच्चन हे सतत चर्चेत असणारे नाव, त्यातील एक कारण म्हणजे त्यांचा रागीट स्वभाव. चाहत्यांवर, माध्यम प्रतिनिधिंवर जया बच्चन सतत चिडत असल्याचे तुम्ही पाहिले असेल. त्याचा अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात असाच एक नवा व्हिडिओ समोर आला आहे यामध्ये अगदी दिवाळीच्या दिवशीही जया बच्चन त्यांच्या चाहत्यांवर चिडताना दिसत आहेत. या व्हिडिओमुळे जया बच्चन यांना ट्रोल केले जात आहे. याच व्हिडीओमधील जया बच्चन ज्याप्रकारे चिडलेल्या दिसत आहेत, त्याची हुबेहूब नक्कल करण्यात आलेला व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

डिजिटल क्रियेटर एमलीने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओ मध्ये एमली जया बच्चन यांची हुबेहूब नक्कल करताना दिसत आहे. जया बच्चन कशाप्रकारे चाहत्यांवर, पत्रकारांवर चिडतात याची हुबेहूब नक्कल तिने केली आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल पाहा व्हायरल होणारा हा व्हिडिओ.

आणखी वाचा : आईला घरकामात मदत करण्यासाठी बनवलेला रोबोट होतोय Troll; नेटकरी म्हणाले ‘तंत्रज्ञान पुरुषसत्ताक विचारसरणी…’

व्हायरल व्हिडीओ :

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून, आतापर्यंत या व्हिडीओला १९ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.