Viral Video : सध्या पावसाळा सुरू आहे. सगळीकडे मुसळधार पाऊस सुरू आहे, पावसाच्या या वातावरणात अनेक जण निसर्गाचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी घराबाहेर पडत आहे. धबधबे, नदी, तलाव आणि समुद्रकिनारी गर्दी करताना दिसतात पण सध्या सगळीकडे पावासाचा जोर वाढला आहे. नदी नाल्यांना पूर येतोय. समुद्र किनारी उंच लाटा धडकत आहे. अशात नागरिकांनी समुद्रकिनारी जाताना सतर्क राहणे, अपेक्षित आहे.

सध्या एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक कुटुंब (पती पत्नी मुलगा आणि मुलगी) समुद्र किनारी समुद्र न्याहाळत बसलेले दिसतात. अचानक एक लाट त्यांच्या अंगावर येते आणि त्या लाटेत ते वाहताना दिसतात. पुढे त्यांच्याबरोबर जे काही घडते ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : “ताई राखी बांध गं..” भर रस्त्यात बहिणींना कळकळीची विनंती करत होता भाऊ, पण एकीनेही राखी बांधली नाही; पाहा VIDEO

लहान मुलांना समुद्रकिनारी घेऊन जाऊ नका!

समुद्र किनारी बसलेल्या एका कुटुंबातील चार सदस्यांच्या अंगावर एक मोठी लाट येते आणि क्षणात ते लाटेबरोबर वाहताना दिसतात. आई आणि लहान मुलगी त्यांचा तोल सावरतात पण त्यांचा चिमुकला मुलगा वाहत जातो तेव्हा वडील त्या चिमुकल्याला वाचवण्याचा जीव तोडून प्रयत्न करतात आणि चिमुकल्याला वाचवतात. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. काही लोकांना धक्का सुद्धा बसेल. व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल की लहान मुलांना समुद्रकिनारी घेऊन जाणे सुरक्षित नाही. फक्त लहान मुले नाही तर कोणीही समुद्रकिनारी जाताना सतर्क राहणे गरजेचे आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : Viral Post: “असा कोणाचा फोन बघायचा नसतो”, चिमुकल्याने केला अनोळखी तरुणीला फोटो दाखवण्याचा हट्ट; पुढे जे घडलं ते पाहून व्हाल थक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

digharamnagar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “चिमुकल्याची सुटका, मोठी धोकादायक लाट” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मला कळत नाही, समुद्र किनारी लहान मुलांना का घेऊन जातात?” तर एका युजरने लिहिलेय, “हे लोक कधी सुधारणार?” आणखी एका युजरने लिहिलेय, “थोडक्यात वाचला चिमुकला” काही युजर्सनी ही जागा पर्यटकांसाठी बंद करण्याची मागणी केली आहे. काही युजर्स व्हिडीओ पाहून संतापले असून पालकांवर टीका केली आहेत.