Diesel Paratha : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो. काही दिवसांपासून असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क डिझेलमध्ये पराठा तळताना दिसत आहे. हा व्हायरल व्हिडीओ चंदीगड येथील ढाब्यावरील आहे. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.
व्हायरल व्हिडीओ
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला तुम्हाला एक व्यक्ती डिझेलला पराठ्यावर टाकताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक फूड ब्लॉगर सांगतो की लोकांना हा पराठा आवडला आहे आणि हा पराठा कचोरी सारखा स्वादिष्ट बनतो. पराठा बनवणारी व्यक्ती सांगते, “पस्तीस वर्षापासून आम्ही हा व्यवसाय करतो. दररोज दोनशे तीनशे डिझेल पराठे आम्ही बनवतो”
पाहा व्हिडीओ
The Cancer Doctor या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हार्पिक पराठा? आयसीएमआर (ICMR) ने आपल्याला व्हे प्रोटिन टाळण्याचा सल्ला दिला आहे. एएसएसएआय (FSSAI) ला मसाल्यांमध्ये एथिलिन ऑक्साइडची पर्वा नाही तर आपण काय करू शकतो. यात काही आश्चर्य नाही की सर्वाधिक कर्करोगाचे रुग्ण असलेल्या देशांपैकी एक भारत आहे.”
या व्हिडीओवर अनेक युजर्स संताप व्यक्त करताना दिसले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. अनेक युजर्सनी डिझेल पराठा आरोग्यासाठी चांगला नाही म्हणत जोरदार टिका केली. अखेर यावर ढाब्याचे मालकांनी प्रतिक्रिया देत खरं काय ते सांगितले.
एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, ढाब्याचे मालिक चन्नी सिंह सांगतात, “आम्ही डिझेल पराठासारखा कोणताही पदार्थ तयार करत नाही आणि ग्राहकांना असा कोणताही पदार्थ सर्व्ह करत नाही. एका ब्लॉगरने फक्त मनोरंजनासाठी हा व्हिडीओ बनवला होता. ही खूप सामान्य गोष्ट आहे की कोणीही असा पराठा बनविणार नाही. पराठ्याला डिझेलमध्ये बनवता येत नाही. मला माहिती नाही की व्हिडीओ कसा व्हायरल झाला मला काल याबाबत माहिती झाले.”
चन्नीने सांगितले की व्हिडीओला संबंधित ब्लॉगरने त्याच्या अकाउंटवरून हटविला असून त्याबाबत माफी सु्द्धा मागितली. ढाब्याच्या मालकाने सांगितले, ” आम्ही फक्त खाद्य तेलाचा वापर करतो. येथे लोकांना स्वच्छ जेवण दिले जाते आम्ही लंगरसाठी दान करतो. आम्ही लोकांच्या जीवाशी कसं खेळणार?”