Pune PMT Viral Video : पुणे हे एक ऐतिहासिक शहर आहे. येथील संस्कृती या शहराचा इतिहास सांगतो. येथील ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे, भाषा संस्कृती ही या शहराची ओळख आहे. पुण्यातील अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. पुण्यातील आणखी एक चर्चेचा विषय म्हणजे पीएटी बस. पुण्यातील पीएमटी बस ही पुणेकरांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. पीएमटीतील अनेक गमती जमती, मजेशीर व्हिडीओ समोर येतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक प्रवासी पीएमटी मधील लाल बटण दाबताना दिसत आहे आणि व्हिडीओमध्ये प्रश्न विचारला आहे, की या बटणाचा काय उपयोग आहे? तुम्ही कधी ही लाल बटण दाबली आहे का? (do you know advantage of pressing red button in pune pmt bus video goes viral)

पीएमटी बसमधील लाल बटणाचा काय उपयोग ?

हा व्हायरल व्हिडीओ एका पीएमटी बसमधील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक प्रवासी पीएमटी बसमधील एका खांबाला लावलेली लाल बटण दाबताना दिसत आहे. तुम्ही कधी ही लाल बटण पाहिली आहे का? किंवा कधी ही लाल बटण दाबली आहे का? या लाल बटणाचा काय उपयोग आहे?

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हेही वाचा : १४ वर्षांनंतर डीएसपींनी भाजीवाल्या मित्राला शोधून काढलं, गाडीतून उतरले आणि गळाभेट घेतली; भावनिक Video व्हायरल!

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

हेही वाचा : सरकत्या जिन्यांवर चढली अन् करू लागली विचित्र प्रकार, शेवटी दोन माणसं आली अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं?

pune_browser या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “काही कल्पना नाही. पण पुणे तिथे काय उणे!” तर एका युजरने लिहिलेय, “बोटाचा व्यायाम करण्यासाठी आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “ते बटण दाबल्याने काहीच होत नाही” काही युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया लिहिल्या आहेत. एक युजर लिहितो, “बटण दाबल्यावर आपल्याला बसायला जागा मिळते” तर एक युजर लिहितो, “बटण दाबली की स्पीड वाढते” काही युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. खरं तर त्या बटणाचा काहीही उपयोग नाही. यापूर्वी पुण्यातील पीएमटी बसमधील असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

Story img Loader