Viral Video : सोशल मीडियावर अनेक नवनवीन गोष्टी व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर फक्त मनोरंजन नाही तर अनेकदा महत्त्वाची माहिती सुद्धा मिळते आणि आपल्या ज्ञानात भर पडते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये किबोर्डवरील A पासून Z पर्यंतच्या सर्व बटणांचे शॉर्टकट्स सांगितले आहे. काही लोकांना किबोर्डवरील बटणाचे काही शॉर्टकट्स माहिती असतील पण पूर्ण शॉर्टकट्स जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ मदत करू शकतो. या व्हिडीओमध्ये A पासून Z पर्यंतच्या बटणांचे शॉर्टकट अगदी सुटसुटीत आणि नीट सांगितले आहे.
व्हायरल व्हिडीओ
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती ‘ctrl+ इंग्रजी वर्णमाला’ या फार्म्युलानुसार A पासून Z पर्यंत शॉर्टकट सांगितले आहे. या व्हिडीओच्या मदतीने तुम्हाला अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळतील. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
A पासून Z पर्यंतच्या बटणांचे शॉर्टकट्स
Ctrl + A = Select All
Ctrl+B = Bold
Ctrl + C = copy
Ctrl + D = Default Font set
Ctrl + E= Center
Ctrl + F = Find
Ctrl + G = Go to
Ctrl + H = Replace
Ctrl + I = Italic
Ctrl + J = Justify
Ctrl + K = Hyperlink
Ctrl + L = Align Text to Left
Ctrl + M = Hanging Indent
ctrl + N = New Document
Ctrl + O = Open
Ctrl + P = Print
ctrl + Q = Add space after Paragraph
ctrl + R = Align text to Right
ctrl+S = Save As
ctrl+T = Left Indent
ctrl+U = Underline
ctrl+V Paste
Ctrl+W = close
Ctrl+X – cut
ctrl+Y = Repeat/Redo
ctrl+Z = undo
@SachienTayal या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “खूप महत्त्वाचे आणि उपयोगी शॉर्टकट्स”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “यापैकी आपण X, c, V चा सर्वात जास्त उपयोग करतो.”