ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथील एका जोडप्याने शेजारच्या घराच्या टेरेसवर कुत्र्याचे डोके असल्याचे पाहिले. खात्री नसल्यामुळे, त्यांनी त्यांचा कॅमेरा अधिक दिसण्यासाठी झूम केला – आणि त्यांनी जे पाहिले ते पाहून त्यांना आश्चर्य वाटले. नक्की काय दिसलं त्यांना जाणून घ्या

काय आहे व्हिडीओमध्ये?

व्हिडीओमध्ये काही अंतरावर टेरेसवर एक काळा आणि पांढरा प्राणी दिसत होता, जो कुत्र्यासारखा दिसत होता. कॅमेरा झूम करत असताना, हे कुत्र्याचे डोके असल्याचे स्पष्ट होऊ लागले – जोपर्यंत प्राणी थोडे हलत नाही तोपर्यंत. प्राण्याने तेवढ्यात आपले डोके फिरवले, जे आतापर्यंत लोकांना दिसत नव्हते आणि सर्वांना आश्चर्यचकित केले. त्यांनी ज्याला कुत्र्याचे डोके मानले होते ते प्रत्यक्षात मांजर होते.

(हे ही वाचा: Viral Video: लग्नात नवरदेव करत होता डान्स तेव्हाच, नवरीने काढली चप्पल आणि…)

व्हिडीओ व्हायरल

ही घटना २३ डिसेंबर रोजी घडली होती आणि ४ जानेवारी रोजी व्हायरलहॉगने शेअर केली होती. व्हिडिओला युट्युबवर १२,००० पेक्षा जास्त व्ह्यूज रेकॉर्ड केले गेले आहेत. यानंतर हा व्हिडीओ अनेक सोशल मीडिया अकाउंटवरूनशेअर करण्यात आला.

(हे ही वाचा: न्यूटनच्या चौथा लॉ आणि करोनाचा काय संबंध? लहानग्याचा भन्नाट शोध एकदा पाहाचं)

(हे ही वाचा: या फोटोत लपलाय बिबट्या, तुम्ही शोधू शकता का?)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत म्हटले आहे की, त्यांनाही कुत्रा आहे असे समजून त्यांची दिशाभूल करण्यात आली आहे. “मला ते टॅबवर दिसले नाही, मला कुत्र्याचे डोके दिसले,” असे एका वापरकर्त्याने सांगितले. दुसरा म्हणाला, “माझा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही.” तिसऱ्या व्यक्तीने, विचित्रपणे, त्याला कोंबडी समजले. “मला वाटले ते कोंबडी आहे. व्वा हाहाहा. ”