Virat Kohli AI Photos: विराट कोहलीचे आज लाखो चाहते आहेत. त्याने क्रिकेटच्या मैदानात चौकार-षटकार मारून विरोधी संघाला मात देताना तुम्ही अनेकदा पाहिले असेल. त्याच्या बॅटींगचे कौशल्य काय आहे हे साऱ्या जगाला माहित आहे. पण तुमच्या मनात कधी असा विचार आला आहे का की, जर विराट क्रिकेटर नसता तर? जर तो इतर क्षेत्रात असता तर कसा दिसला असता? तुम्ही असा विचार कधीही केला नसेल याची आम्हाला खात्री आहे. ही प्रत्यक्षात अशक्य असलेली कल्पना आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने शक्य करून दाखवली आहे. सध्या कित्येक आर्टिफिशिअल इंटेलिजेन्सच्या फोटोमध्ये एडिटिंग टूलच्या मदतीने असे अविश्वसनीय फोटो तयार केले आहे जे खऱ्या आयुष्यात अशक्य आहेत.आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने एका आर्टिसने विराट कोहली वेगवेगळ्य़ा प्रोफेशनच्या गेटअपमध्ये कसा दिसेल हे दर्शवले आहे जे पाहून यूजर्स देखील थक्क झाले आहेत.

क्रिकेटर सोडून १० प्रोफेशनल लूकमध्ये दिसला विराट

SAHID या AI कलाकाराने विराटला १० वेगवेगळ्या प्रोफेशनच्या वेशभूषेत दाखवले आहे. ‘मिडजर्नी’ नावाच्या अॅपवरून हे फोटो तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे. विराटला दशावतरातील फोटोंमध्ये, डॉक्टर, अंतराळवीर, फुटबॉलपटू, योद्धा, राजा, पायलट, पोलीस, फळ विक्रेता इत्यादी म्हणून दाखवण्यात आले आहे. फोटो पाहून तुम्हाला हे खरेखूरे फोटो वाटू शकतात पण ते तसे नाही. ही फक्त एका एआय कलाकाराची कल्पना आहे. हे संपूर्ण कमाल आर्टिफिशियल इंटेलिजन्सची आहे.

हेही वाचा – ‘डोसा, समोसा, जिलेबी, फ्राइड राईस…’ तुम्हीही अमरनाथ यात्रेला जाणार असाल तर जाणून घ्या कोण कोणत्या खाद्यपदार्थांवर घातली बंदी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यूजर्सने प्रशंसा केली

विराटच्या वेगवेगळ्या दशावताराचे अनेक यूजर्सनी कौतुक केले आहे. एका युजरने म्हटले की, ‘विराट फक्त क्रिकेटसाठी बनला आहे’. तर दुसरा म्हणाला, ‘राजाच्या फोटोची गरज नव्हती, तो आधीच विराट आहे.’