Dog Singing Video : कुत्रा हा माणसाचा सर्वांत चांगला मित्र मानला जातो. तो माणसाला प्रत्येक परिस्थितीत साथ देतो. माणसाचे दु:ख, वेदना चांगल्या प्रकारे समजून घेतो. दु:खद प्रसंगी तो आपले दु:ख वाटून घेतो. तुमच्या सुखात सामील होतो. कुत्र्याचे त्याच्या मालकाशी इतके घट्ट नाते जोडले जाते की, तो मालकाच्या अनेक कलाही अंगीकारतो. सध्या अशाच एका कुत्र्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय; ज्यात तो कुत्रा मालकाबरोबर बसून चक्क सूरात गाणे गातोय. मालकाच्या सूराबरोबर तो आपल्या आवाजाचा टोन जुळविण्याचा प्रयत्न करतोय.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक जण हृतिक रोशनच्या ‘अग्निपथ’ चित्रपटातील ‘अभी मुझे मैं कहीं’ हे गाणे अतिशय सुंदर आवाजात गात आहे. यावेळी त्याच्या अगदी शेजारी एक कुत्रा बसला आहे, तो सूरात जसजशी गाण्याची एकेक ओळ गातोय, तसतसा तो कुत्राही त्याच्या सूरात सूर मिळविण्याचा प्रयत्न करतोय. जेव्हा तो व्यक्ती उच्च स्वरात गातो तेव्हा कुत्रादेखील त्याप्रमाणे सूर लावण्याचा प्रयत्न करतो. दोघांची ही जुगलबंदी पाहून सोशल मीडियावर लोकांनी खूप आश्चर्य व्यक्त केले आहे. कारण- आतापर्यंत आपण पक्ष्यांचे सुमधुर आवाजातील ओरडणे ऐकले; पण एखाद्या कुत्र्याचे अशा प्रकारे गाणे पहिल्यांदाच ऐकले असेल. त्यामुळे तुमच्याप्रमाणे सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहणारे आता आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

तरुणींची भररस्त्यात बाईक रायडर्ससमोर स्टंटबाजी, तेवढ्यात तोल गेला अन्…; शेवटी नको तेच घडलं, पाहा VIDEO

सच कडवा है नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यावर भरपूर लाइक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. व्हिडीओवर कमेंट करताना लोक कुत्र्याला आमचा खरा साथीदार असल्याचे म्हणत आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिले, “असे दिसते की कुत्र्याचंही हृदय तुटलं आहे.” दुसऱ्या एका युजरने लिहिले, “क्यूट डॉगी, अमेझिंग सिंगर.” त्यावर आणखी एका युजरने आपल्या कुत्र्याची आठवण करून लिहिले, “मिस यू माय बुगू.” आणखी एका युजरने लिहिले, “टॅलेंट ब्रो…”