Dog Helps Rag Picker : कुत्र्याच्या इमानदारीबद्दल तर तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, त्याच्यावर प्रेम करणाऱ्या मालकावर तोही जीवापाड प्रेम करतो, वेळीप्रसंगी जीवाची पर्वा न करता मदतीला धावू जातो. त्यामुळे कुत्रा हा माणसाचा चांगला मित्र असतो असे म्हटले जाते. याच इमानदार प्राण्याचा एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात एका पाळीव कुत्र्याचे कचऱ्या वेचणाऱ्या महिलेसोबतच्या अनोख्या नात्याचे दर्शन घडत आहे. हा व्हिडीओ खूप काही शिकवूण जाणारा आहे.

व्हायरल एक पाळीव कुत्रा कचरा वेचणाऱ्या महिलेला कचरा घेऊन जाण्यास मदत करत आहे. यातून तो आपल्या मालकावरील कामाचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. कुत्रा आणि कचरा वेचक महिलेच्या मैत्रीचा हा अनोखा व्हिडीओ युजर्सचे मन जिंकत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ तुम्ही पाहू शकता की, एक महिला पाठीवर कचऱ्याची भली मोठी बॅग घेऊन जाताना दिसत आहे, ज्यात अनेक नको असलेल्या टाकाऊ वस्तू आहेत. तिच्या पाठोपाठ एक कुत्राही त्याच्या वजनाच्या मानाने मोठी पिशवी ओढत असल्याचे दिसत आहे. त्या कुत्र्याने महिलेची मदत करण्यासाठी कसलीही कसर सोडली नाही जे पाहून खूप आनंद होतो.

The Figen नावाच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जो १.२ मिलियनहून अधिक पाहिला गेला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, कुत्रे आपला चांगला मित्र आहे. यावर एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, “मला नेहमीच वाटते की, कुत्रे हे माणसांचे चांगले मित्र आहेत. तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, नवी दिल्लीसारखे दिसते. कचरावेचक घरोघरी कचरा गोळा करतात. पण एका कुत्र्यासाठी हे खूप मोठे काम आहे.