एखाद्या घृणास्पद कृत्यानंतर ‘कधी माणूस राक्षस बनेल हे सांगता येत नाही’ हे सांगणाऱ्या अनेक घटना तुम्ही आतापर्यंत ऐकल्या असतील. नेमकी अशीच एक घटना समोर आली आहे. ही घटना ऐकून तुमचा माणुसकीवरचा विश्वास उडून जाईल. या घृणास्पद घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. एका वृद्ध व्यक्तीने कुत्र्यावरच बलात्कार केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्वतःच्या या घृणास्पद कृत्याबाबत कुठलाही पश्चाताप न करता या म्हाताऱ्यानं एका मुक्या प्राण्यासोबत जे कृत्य केलंय ते ऐकून तुमचं हृदय हेलावून जाईल आणि तुम्हाला अस्वस्थ करेल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका ६० वर्षीय म्हाताऱ्यानं माणुसकीच्या सर्व मर्यादा ओलांडत कुत्र्यासोबत हे घृणास्पद काम केलं आहे. कुत्र्यावर बलात्कार करताना या म्हाताऱ्याच्या सुनेनं हा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला आहे. आपली सून आपल्या या कृत्याचा व्हिडीओ बनवत असल्याचं या म्हाताऱ्याच्या लक्षात आल्यानंतर तो सुनेच्या मागे धावला आणि तिच्याकडून मोबाईल हिसकावण्यासाठी तिच्याशी झटापट सुरू केली. त्यानंतर सुनेनं कसा तरी आरोपी सासऱ्यापासून आपला मोबाईल वाचवला. हा व्हिडीओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यात सासरा आणि ती महिला यांच्यात हाणामारी देखील झालेली दिसून येत आहे.

आणखी वाचा : विना तिकीट प्रवास करणाऱ्याला पोलीस कर्मचाऱ्याने चालत्या ट्रेनमध्ये लाथ मारली, क्रूरतेचा VIDEO VIRAL

आणखी वाचा : समुद्रकिनाऱ्यावर कुत्र्याच्या पिल्लासोबत खेळणाऱ्या माणसाचा हा VIRAL VIDEO पाहून तुमच्याही चेहऱ्यावर स्माईल येईल

यानंतर सूनेने या सर्व घटनेबाबत पीपल फॉर अॅनिमल्स (पीएफए) नावाच्या प्राणी प्रेमी आणि संवर्धन संस्थेशी संबंधित टीमला माहिती दिली आणि सर्व घटनाक्रम सांगितला. पीडितेचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर पीएफएचे पथक तातडीने सक्रिय झाले आणि त्यानंतर वेगाने या घटनेबाबत कारवाई सुरू केली. ही बाब उघडकीस येताच पोलिसांनी ६० वर्षीय आरोपी सासऱ्याला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलंय. या आरोपी सासऱ्याने यापूर्वीही असे घृणास्पद कृत्य केल्याचं स्थानिक रहिवाशांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा : VIRAL : मुलांना गाडीत ठेवून पिकनिक एन्जॉय करत होते, अन् डोळ्या देखत स्कॉर्पिओ जळून खाक झाली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेत पोलिसांनी सासऱ्या विरुद्ध भादंवि कलम ३७७ अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे. या प्रकरणाची माहिती देताना एसपी सिटी ज्ञानेंद्र यांनी सांगितले की, त्यांनी व्हायरल झालेल्या व्हिडीओची दखल घेत कारवाई केली आणि प्राण्यावर अत्याचार केल्याप्रकरणी त्याला अटक केली आहे.