कुत्र्यांना निष्ठावान प्राणी म्हटले जात नाही. त्यांच्या मालकासह ते इतरांच्या रक्षणासाठीही स्वत:च्या जीवाची बाजी लावतात. आतापर्यंत तुम्ही त्यांच्या निष्ठेचे अने किस्से एकले असतील. पण आता आम्ही तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहोत ती ऐकल्यानंतर तुम्हीही तुमच्या घरी कुत्रा आणण्याचा विचार सुरू कराल. खरं तर, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक कुत्रा एका मुलीला चोरांच्या तावडीतून वाचवताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी रस्त्याने चालत असल्याचे दिसत आहे. तेवढ्यात एक कार तिच्या मागून येते आणि मुलीसमोर थांबते. कारमधून एक व्यक्ती बाहेर येतो, ज्याचा हेतू मुलीला पळवून नेण्याचा आहे. हे पाहून ती मुलगी संकोचते आणि मागे पाऊल टाकू लागते. हे पाहून ती व्यक्तीही कार मागे आणते आणि मुलीला पकडण्यासाठी गाडीतून उतरते. मात्र, यादरम्यान एका कुत्र्याला घटनेचा सुगावा लागतो आणि तो त्या व्यक्तीच्या मागे धावत येतो. त्या व्यक्तीने कुत्र्याला पाहताच तो परत कारमध्ये बसतो आणि शांतपणे निघून जातो. कुत्राही काही अंतरापर्यंत गाडीचा पाठलाग करतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – हृदयद्रावक! थोड्याशा मौजमजेनं घेतला जीव; ४० फूट उंचीवरून पडला चिमुकला, अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडिओच्या शेवटी, या घटनेच्या भीतीने मुलगी रडायला लागते आणि तेथून निघून जाते. आता या घटनेचे पुढे काय झाले याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. प्रत्येकजण मुलीचा जीव वाचवणाऱ्या कुत्र्याचे कौतुक करताना दिसत आहे.