सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. पाळीव प्राण्यांचे व्हिडीओ तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म स्क्रोल करताना हमखास दिसतील. यापैकी अनेक व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्याला हसू आवरत नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अनेक जण घरी कुत्रा पाळतात आणि आपल्या घरातील सदस्यासारखी वागणूक देतात. त्यामुळे कुत्र्याला देखील माणसासारख्या सवयी लागतात. अशीच प्रचिती व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर येते. कुत्रा घरी एकटा असताना त्याने केलेली कृती पाहून तुम्हालाही हसू येईल. पण भूक लागली तर शेवटी युक्ती लढवावी लागणारच हे देखील तितकंच खरं आहे.

व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये एक कुत्रा घरात एकटा असताना भूक लागल्याचं दिसत आहे. किचनच्या ओट्यावर ठेवलंलं खाणं खाण्यासाठी युक्ती लढवतो. तिथे पोहोचण्यासाठी खुर्चीचा आधार घेताना दिसत आहे. ओट्यावर ठेवलेल्या खाण्यापर्यंत सहज पोहोचावे म्हणून कुत्रा हे करत आहे. कुत्रा अन्नापर्यंत पोहोचल्यानंतर लगेचच खाणं खाण्यास सुरुवात करतो. यादरम्यान त्याचा मालक हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात चित्रित करत असतो. मालक जवळ येत असल्याचं पाहून कुत्रा घाबरतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. बातमी लिहिपर्यंत सोशल मीडियावर याला सुमारे ८ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक जणांनी हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. तसेच फोटोखाली मजेशीर प्रतिक्रिया नोंदवत आहेत.