Dog Attack Viral Video: देशातील अनेक राज्यांमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत आहे. दररोज, कोणी ना कोणी त्यांना बळी पडत आहे. काही कारण नसताना अनेकदा कुत्रे लोकांवर हल्ला करतात. अनेकदा कुत्रे टोळीने हल्ला करताना दिसतात ज्यामुळे लोकांना घराबाहेर पडतानाही भीती वाटते. सोशल मीडियावर अशा हल्ल्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
आता राजस्थानातील अलवरमध्ये, घराबाहेर चालत असलेल्या एका १८ वर्षीय मुलीवर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला केला. ही घटना ७ मार्च रोजी सायंकाळी ५.४५ वाजता घडली. ती ज्या रस्त्यावर चालत होती त्या घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली.

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, नव्या नावाची ही मुलगी अलवरच्या जेके नगरमध्ये चालत असताना फोनवर बोलत होती, तेव्हा सुमारे १० भटक्या कुत्र्यांनी तिच्याअंगावर अचानक धाव घेतली. कुत्र्‍यांच्या टोळीने तिला चारी बाजूंनी घेरले. तिला अक्षरश: खाली पाडले. खाली पाडण्यापूर्वी किमान आठ वेळा चावले. व्हायरल व्हिडिओमध्ये ती ओरडताना दिसत आहे आणि कुत्रे तिच्यावर हल्ला करत आहेत.

स्थानिकांच्या मदतीने तिचा जीव वाचला

दरम्यान, दुचाकीवरून जाणारी एक महिला थांबते आणि स्थानिक रहिवाशांच्या मदतीने कुत्र्यांना हाकलून लावते आणि त्यांना तेथून पळवून लावते. नव्या म्हणाली, ‘त्यांनी मला सर्व बाजूंनी घेरले.’ मी त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, पण तो मला पुढे आणि मागून खाली खेचू लागला. मी जमिनीवर पडले आणि ते माझ्यावर हल्ला करत राहिले. मला अजूनही धक्का बसला आहे.

तातडीने कारवाईची मागणी

स्थानिक नगरसेवक हेतराम यादव म्हणाले की, भटक्या कुत्र्यांच्या दहशतीबाबत महापालिकेकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. ते म्हणाले, ‘आम्ही महानगरपालिकेकडे अनेक वेळा तक्रार केली आहे, पण कोणतीही कारवाई झालेली नाही. जर ही समस्या लवकर सोडवली नाही तर भविष्यात आणखी गंभीर घटना घडू शकतात. अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करावी.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय, गेल्या १० दिवसांत उत्तर प्रदेशातील बहराइचच्या विविध भागात कुत्र्यांच्या हल्ल्यात एका मुलाचा मृत्यू झाला आहे आणि १४ लोक जखमी झाले आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की अधिकारी शिवपूर आणि महसी ब्लॉकमधील बाधित गावांमधील रहिवाशांना सावध करण्यासाठी लाऊडस्पीकरचा वापर करत आहेत आणि संध्याकाळी बाहेर पडताना काठ्या बाळगण्याचा सल्ला देत आहेत.