मद्यपान हे आरोग्यासाठी वाईट आहेच पण मद्याच्या नशेत लोक काय करतील याचे त्यांना भान नसते. अनेकदा मद्याच्या नशेत मोठे अपघात होतात तर अनेकदा मद्यपान करून लोक भररस्त्यात गोंधळ घालतात. काही दिवसांपूर्वी मद्यधुंद अवस्थेत एक तरुणी भररस्त्यात जाऊन बसल्याचा व्हिडोओ समोर आला होता. तर नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये मद्यधुंद स्कुटर चालक रस्त्यात झोपतो आहे. अशा धक्कादायक घटनांचे व्हिडिओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये मद्यधुंद अवस्थेत एक माणूस उंटाच्या पाठीवर बसला आहे. उंट रस्त्यावरून घेऊन फिरत आहे. व्हिडिओ पाहून नेटकरी चक्रावले आहेत.

हैदराबादमध्ये रात्री उशिरा एक मद्यधुंद माणूस पीव्ही नरसिंह राव एक्सप्रेसवेवरून उंटावर स्वार होताना दिसला. उंटावर बसलेला माणूस उंटाचा मालक असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तो माणूस मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसते कारण त्याचे उंटावर काही नियंत्रण नव्हते. तो उंटाच्या पाठीवर झोपलेला दिसत आहे, त्याला कसलीही शुद्ध नाही. उंट घेऊन तो थे उड्डानपुलावरून धावत आहे. उड्डाणपुलाच्या कठड्याच्या जवळून जे अत्यंत धोकादायक आहे. कारण चूकूनही त्याचा तोल गेला तर तो थेट उड्डाणपुलावर खाली रस्त्यावर पडून शकतो आणि जीव गमावू शकतो. त्याची अवस्था पाहून बाजूने जाणाऱ्या वाहनचालका चिंतीत झाले होते. एका कारमधील व्यक्तीने हा व्हिडिओ शूट केला.

इंस्टाग्राम वापरकर्ता इकराम उल्लाह शाह यांनी शेअर केलेल्या घटनेच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, उंट नियंत्रणाबाहेर होता कारण त्यामुळे स्वार आणि जवळच्या वाहनांसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती.

क्लिपमध्ये, शाह त्या व्यक्तीला शुद्धीवर आणण्यासाठी बाटलीतून पाणी फेकून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याने आणि त्याच्या एका मित्राने अखेर उंटाचा वेग कमी केला, त्याला वीजेच्या खांबाला उंटाला बांधले. त्यानंतर मद्यधुंद स्वाराला उंटावरून खाली उतरण्यास मदत केली, ज्यामुळे मोठा अपघात टळला.

व्हिडिओ व्हायरल होताच, त्यामुळे रस्ता सुरक्षा आणि प्राण्यांच्या कल्याणाबद्दल चिंता निर्माण झाली. अनेक वापरकर्त्यांनी शाह आणि त्यांच्या मित्राचे प्राण्याला वाचवल्याबद्दल कौतुक केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अनेकजण अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करून निघून जाणे पसंत करतात अशा जगात, या एकाच व्यक्तीने धाडस केले! खरोखरच कौतुकास्पद आहे,” एका वापरकर्त्याने म्हटले. इतरांनी या कृतीचे “असंख्य जीव वाचवणारे धाडस” असे कौतुक के