Shocking video: काही तरुण नको तिथे मस्ती करायला जातात, त्याच्या परिणामांची चिंता न करता ते कधी कधी अशा गोष्टी करतात की नंतर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. आपल्या समाजात दोन प्रकारचे लोक आहेत, एक जे प्राण्यांवर जीव ओवाळून टाकतात तर दुसरे जे वेळोवेळी प्राण्यांना विनाकारण त्रास देतात. सध्या असंच एक गंभीर प्रकरण समोर आलं आहे. दरम्यान तुम्ही आतापर्यंत पार्ट्यांमध्ये मित्र एकमेकांना जबरदस्ती दारु पाजताना, आग्रह करताना पाहिलं असेल. मात्र मद्यधुंद तरुणांच्या टोळक्याने चक्क सापाला दारु पाजली आहे. याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

दारूच्या व्यसनापोटी माणूस पिसाळलेल्या प्राण्यांसारखा विचित्र वागू लागल्याचे आपणही पाहिले असेल. त्याचंच हे भयंकर उदारण समोर आलंय.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, अजगर सापासोबत मद्यपी तरुण क्रूर कृत्य करत आहेत. एका तरुणानं सापाचं तोंड पकडलं आहे तर दुसरे दोन तरुण दारूच्या दोन बाटल्या अक्षरश: सापाच्या तोंडात रिकाम्या करत आहेत. आजूबाजूला अनेक लोक आजबाजूला उभे राहून हे सगळं पाहत आहेत. मात्र कुणीही या तरुणांना असं करण्यापासून रोखल्याचं व्हिडीओमध्ये दिसत नाहीये. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत आता या तरुणांचा शोध सुरु केला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बापरे! दिल्लीत फटाक्यांमुळे ११ वर्षाच्या मुलाने गमावले डोळे; धक्कादायक सीसीटीव्ही VIDEO समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही मजेदार असतात तर काही व्हिडीओ पाहून संताप येतो. हा व्हिडीओ @worldXmonitor या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला हजारो लाईक्स, व्ह्युज मिळत असून नेटकरी संतापले आहेत.