चार दिवसांनी म्हणजेच येत्या ८ मार्च रोजी जगभरात ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ साजरा केला जाईल. या दिवशी महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या सुरक्षेची, स्वातंत्र्याची चर्चा केली जाईल, पण आजही समाजातील अनेक स्त्रियांवर अत्याचार बलात्कार केले जातात. जे आपण रोज बातम्यामधून पाहत आणि वाचत असतो. शिवाय अनेकदा मुलींनी असं वागायला हवं, हे कपडे घालायला नकोत, असं सांगितलं जातं. पण मुलींपेक्षा मुलांना जर मुलींची इज्जत करण्याचे संस्कार दिले तर जगात एकही बलात्कार होणार नाही असं म्हटलं जातं. पण हा व्हिडीओ पाहून तसं होणं कठिण असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

कारण सध्या अशा एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहून नेटकऱ्यांसह मुलींच्या पालकांनी संताप व्यक्त केला आहे. शिवाय दिल्लीसारख्या ठिकाणी अशा घटना घडत असतील तर इतर ठिकाणी मुलींचे काय हाल होत असतील? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. शिवाय नेटकरी आणि पालक आपला संताप आणि मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह का उपस्थित करत आहेत. ते तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर समजले.

हेही पाहा- Video: वहिनीच्या प्रेमात पडला, गावकऱ्यांसमोर द्यावी लागली ‘अग्निपरीक्षा’; निखाऱ्यात हात घातला अन्…

हेही पाहा- डिजेचा कर्कश आवाज ठरला नवरदेवाच्या मृत्यूचं कारण, वधुच्या गळ्यात हार घातला आणि स्टेजवरच…

@Paridua2 नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ दौलत राम कॉलेजमधील असण्याचं सांगण्यात येत आहे. या व्हिडीओमध्ये मुलांचा एक मोठा गट दिल्ली विद्यापीठ (DU) कॉलेजसमोरून जाताना दिसत आहे. ही मुलं कॉलेजच्या बाहेरुन जात असताना त्यांना कॉलेजच्या ग्राऊंडवरती दोन मुली उभ्या असल्याचं दिसताच त्यांनी मोठं मोठ्याने आवाज देत शिट्ट्या मारायला सुरुवात करतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धक्कादायक बाब म्हणजे त्यातील एक तरुण ‘पप्पी दे तरी किंवा घे तरी’ असं म्हणत असल्याचं ऐकू येत आहे. त्यामुळे अनेक पालकांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे. सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने, खरंच खूप वाईट असल्याचं म्हटलं आहे. तर आणखी एकाने हे संतापजनक असून यावर पोलिसांनी काहीतरी कारवाई करायला हवी असं म्हटलं आहे.