Dubai FLood Fact Check Video : लाईटहाऊस जर्नालिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असलेला एक व्हिडीओ आढळून आला, ज्यामध्ये नवी दिल्लीत भीषण पाऊस पडत असून विमानतळ परिसर पाण्याखाली गेल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हिडीओतही तुम्ही पाहू शकता, मुसळधार पावसामुळे संपूर्ण विमानतळ परिसरात जलमय झाला आहे. तिथे विमान उड्डाण ठप्प झालयं. पण, खरंच हा व्हिडीओ नवी दिल्लीतील आहे का याविषयीचे सत्य जाणून घेऊ…
काय होत आहे व्हायरल?
एक्स युजर HASSAN ने दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह हा व्हिडीओ शेअर केला.
इतर युजर्सदेखील असाच दावा करून तोच व्हिडीओ शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही व्हायरल व्हिडीओमधून मिळालेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून तपास सुरू केला, यावेळी व्हिडीओवरील मजकूर हटवलेला एक व्हिडीओ सापडला.
याद्वारे आम्हाला २०२४ मध्ये YouTube वर अपलोड केलेला एक व्हिडीओ आढळला. व्हिडीओमध्ये दुबई विमानतळ दाखवल्याचे सूचित केले होते.
आम्हाला फुल स्कायवे या फेसबुक पेजवरदेखील २०२४ मधील हा व्हिडीओ आढळला.
आम्हाला डेली मेलच्या एक्स प्रोफाइलवरही एक समान व्हिडीओ आढळला.
आम्हाला joe.co.uk वर एक लेखदेखील आढळला.
लेखात म्हटले आहे : दुबईमध्ये एका दिवसात दोन वर्षांत पडला इतका पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे. दुबईमध्ये सामान्यतः दरवर्षी सरासरी ३.१२ मिमी पाऊस पडतो.
खराब हवामानामुळे दुबई विमानतळावरून विमानांचे मार्ग बदलण्यात आले आणि विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले, मुसळदार पावसामुळे शहरात मोठ्या प्रमाणात बिकट स्थिती निर्माण झाली आहे.
आम्हाला टीआरटी वर्ल्डच्या YouTube चॅनेलवरदेखील एक समान व्हिडीओ आढळला.
निष्कर्ष :
दुबई विमानतळावरील २०२४ चा मुसळधार पावसाचा एक जुना व्हिडीओ नवी दिल्लीत जोरदार पावसाचा असल्याचा दावा करत व्हायरल केला जात आहे, त्यामुळे व्हायरल झालेला व्हिडीओ दिशाभूल करणारा आहे.