लग्नात वरातीत लोक डान्स करण्यात मग्न असतात तेव्हा वऱ्हाडी मंडळी नवरा-नवरीवर पैसे उधळताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पैसे उडवताना ते मागे-पुढे कोणाकडेच बघत नाहीत. पैसे उधळणीचे अनेक व्हिडीओ आपण यापूर्वी पाहिलेही असतील. मात्र, या व्हिडीओमध्ये एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये चक्क नवरीबाईनेच तोंडात ५०० रूपयाची नोट धरून जबरदस्त डान्स केलाय. हे वाचून तुम्हाला अजब वाटणं सहाजिकच आहे. गंमत म्हणजे डान्स करताना नवरीचा जोश पाहून सारेच जण बघत राहीले. पाहा हा नवरीबाईचा देसी स्वॅग…

नवरदेव आपल्याला घ्यायला येणार याचा आनंद प्रत्येक नवरीला असतो. लग्नात नटूनथटून ती नवरदेवाची आतुरतेने वाट पाहत असते. वरात दारात येताच नवरीच्या बहिणी, मैत्रिणीही तिला चिडवू लागतात. त्यावेळी नवरी हळूच लाजते. असंच काहीसं चित्र तुम्ही आतापर्यंत अनेक लग्नात पाहिलं असेल. पण सध्या सोशल मीडियावर अशा नवरीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जी आपल्या लग्नातल्या वरातीत तोंडात ५०० रूपयाची नोटी धरून सैराट झाली आणि बेफाम डान्स करत सुटली.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये नवरीने तिच्या तोंडात ५०० रुपयांची नोट धरून बिनधास्त आणि मनसोक्त नाचताना दिसत आहे. तिच्या हटके डान्सची स्टाइल पाहून बघणारे केवळ बघतच राहीले. कॅमेरामनपासून नातेवाईकांपर्यंत सगळेच या नवरीबाईकडे टक लावून तिचं कौतुक करताना दिसून आले. यात नवरीने लाल रंगाचा सुंदर लहंगा परिधान केलेला दिसून येतोय. नववधूच्या वेशभूषेत ही नवरी खूपच सुंदर दिसून येतेय. यात डान्स करताना नवरीचा जो जोश दिसून आला ते पाहून वरातीतले इतर जण ही उत्साहाने डान्स करू लागले.

आणखी वाचा : MBBS डॉक्टरने शेण खाल्लं…म्हणतो यात व्हिटॅमिन असतं! पाहा हा VIRAL VIDEO

आणखी वाचा : Desi Groom Viral Video: अन् नवरीला पाहून भरमंडपात नवरदेव रडला, सावरणंही झालं कठीण… पाहा VIRAL VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘Wedding Diaries’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. आतापर्यंत या व्हिडीओ २६ हजार व्ह्यूज मिळाले आहेत. त्यानंतर नवरीचा हा बिनधास्त अंदाजातला डान्स पाहून नेटकऱ्यांना हा व्हिडीओ एकदा दोनदा नव्हे तर पुन्हा पुन्हा हा व्हिडीओ पाहण्याचा मोह आवरत येत नाहीय. नवरीबाईचा हा स्ट्रीट डान्स लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. तिचे डान्स मूव्ह पाहूनच जाणवतं की ती किती आनंदात आहे. या व्हिडीओला भरपूर लाईक मिळाले आहेत. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत नवरीच्या डान्सचं कौतुकही केलं आहे.