Viral video: लहान मुलांना त्यांच्या वयात सर्वात महत्त्वाचे असतात ते आई-वडिल, आई वडिलांशिवाय त्यांचं विश्वच नसतं. आई वडिलांचा वेळ त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो. लहान मुलं आई-बाबांनाच त्यांचे मित्र समजतात. पूर्वी बाबा जरी कामासाठी बाहेर गेले तरी आई मुलांजवळ घरी असायची. मात्र बदलेल्या लाइफस्टाईलमुळे आता सर्वच बदललं आहे. आई वडिल दोघही कामाला जात असून मुलं हे एक तर पाळणाघर किंवा दुसऱ्या कोणाकडे तरी असतं.

मात्र हेच वय असतं ज्या वयात मुलांना आई-वडिलांची जास्त गरज असते. याच वयात त्यांच्यावर संस्कार होत असतात. आयुष्याची काही सुरुवातीची पानं ही मुलं पालटत असतात. आई-वडिल कसे बोलतात कसे वागतात याचा मुलांवर मोठा परिणाम होतो. अशाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये आई-वडिलांचं वागणं, वेळ न देणं यामुळे चिमुकल्याला आलेलं एकाकीपण. या सगळ्याचा या मुलाला किती त्रास होतोय हे समोर आलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

चिमुकल्याच्या अपेक्षा एकून येईल डोळ्यात पाणी

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका कोरियन शो दरम्यान या चिमुकल्याला त्याच्या पालकांबद्दल विचारलं असता त्याला रडू कोसळत. या मुलाचं नाव ज्यूम जी-युन आहे. ज्यूमला विचारलं जातं की तुला सगळ्यात कोण आवडतं. तेव्हा ज्यूम म्हणतो की माहित नाही. कारण मी घरी एकटाच असतो. माझ्याबरोबर खेळायलाही कोणी नसतं.

बाबांनी मला प्रेमानं हाक मारावी, आईला मी आवडत नाही

यानंतर त्याला त्याच्या वडिलांबद्दल विचारलं तेव्हा त्याने धक्का धक्कादायक उत्तरं दिली. बाबा जेव्हा चिडतात तेव्हा ते खूप ओरडतात आणि वेड्यासारखे वागतात असं ज्यूमने सांगितलं. बाबांकडून काय अपेक्षा आहेत असं त्याला विचारलं तेव्हा ज्यूम म्हणाला की बाबांनी मला प्रेमाने हाक मारावी. मुलाखातकाराने ज्यूमला आई बद्दल विचारलं. तेव्हा त्याची उत्तरं तुम्ही ऐकून आवाकच व्हाल. कदाचित माझ्या आईला मी आवडत नाही असं ज्यूम म्हणाला. आपल्या आईबद्दल बोलताना ज्यूमच्या डोळ्यांत अक्षरश: अश्रू तरळले. आपल्या आईसोबत तु याबद्दल बोललास का यावर ज्यूम म्हणाला की ती माझं कधीच ऐकत नाही. आईने माझ्यासोबत खेळावं, अशी साधी अपेक्षा ज्यूमने व्यक्त केलीये.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> रेल्वे रुळ ओलांडताना भरधाव वेगात सुरत-वांद्रे टर्मिनस आली अन् क्षणात वृद्ध…; गुजरातमधील धडकी भरवणारा VIDEO व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. यावर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. लहान मुलांना योग्य पद्धतीनं संगोपन केलं नाही तर पुढे ही मुलं नाईट वळणाला जाण