Buffalo and Elephant Video: हत्ती हा शांत प्राणी मानला जातो. तो इतका मोठा आणि वजनदार आहे की त्याला पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी असा टॅग मिळाला आहे. सिंहासारखा धोकादायक प्राणीही त्याच्यावर एकट्याने हल्ला करण्याचे धाडस करत नाही. विचार करा, सिंहाला न घाबरणारा प्राणी म्हशीच्या छोट्या पिल्लाला घाबरला हे बघायला मिळालं तर? या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

म्हैस आणि हत्ती यांच्या आकाराची आणि ताकदीची तुलना होऊ शकत नाही. त्यातही एखादे म्हशीचे रेडकू थेट हत्तीला घाबरवताना दिसत आहे. हे दृश्य खूपच मजेदार होते. असाच काहीसा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे आणि हे दृश्य पाहून कोणालाही हसू येईल.

(हे ही वाचा: Viral: आधी पुष्पहार कोण घालणार? यावरून वधू-वर भिडले; नेटीझन्स म्हणतात ‘हे लग्न आहे की रणांगण’)

(हे ही वाचा: पाणी पिणाऱ्या सिंहाला ‘या’ व्यक्तीने मागून ढकलायचा केला प्रयत्न अन्; Video Viral)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

इंस्टाग्रामवर wild_rango नावाच्या अकाऊंटवरून हा मनोरंजक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला आतापर्यंत २ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर ८० हजारांहून अधिक लोकांनी याला लाईक केले आहे आणि शेकडो लोकांनी कमेंट्स दिल्या आहेत. लोकांनी कमेंटमध्ये हत्तीची स्तुती केली आहे, ज्याप्रकारे तो मागे जातोय आणि मुलाला इजा न करण्याचा प्रयत्न करत आहे. काही लोकांनी लिहिले की हत्ती हुशार आणि दयाळू प्राणी आहे.